Goat Farming : ‘या’ आहेत शेळ्यांच्या 10 प्रमुख प्रजाती; वाचा… त्यांची वैशिष्ट्ये, मुळस्थान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात मांसाला मोठी मागणी वाढली असून, त्याचे दर ही अधिक आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी शेतीला जोडून शेळीपालन (Goat Farming) हा जोडधंदा करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकरीच नाही तर सुशिक्षित लोक देखील या शेळीपालनात उतरत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळ्यांच्या प्रमुख्य 10 जातींबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येक जातीचे आपले एक गुणवैशिष्ट्ये आहे. ज्यामुळे त्या-त्या भागात शेतकरी वैशिष्ट्ये प्रजातीच्या माध्यमातून शेळीपालन (Goat Farming) करत असतात.

या आहेत शेळ्यांच्या 10 प्रजाती (Goat Farming Top 10 Goat Breeds)

1. बोअर शेळी : बोअर शेळीची जात ही मूळची दक्षिण आफ्रिकेतील असून, ती भारतात देखील पाळली जाते. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये बोअर शेळ्यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात आढळते. बोअर शेळ्यांचे शरीर पांढरे आणि विशिष्ट तपकिरी डोके असते. या जातीची शेळी सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीशी जुळवून घेते.

2. माळवा शेळी : माळवा शेळीची जात ही मूळची मध्य प्रदेश राज्यातील आहे. ही शेळी अधिक दूध देते त्यामुळे तिचे पालन हे दूध उत्पादनासाठी केले जाते. ही शेळी योग्य पोषकतत्वे मिळाल्यास ५० किलोपर्यंत वाढू शकते. ज्यामुळे तिला दुर्गापूजा आणि ईदसाठी मोठी मागणी असते.

  1. तेलीचेरी शेळी : तेलीचेरी शेळी ही प्रामुख्याने दक्षिण भारतातील तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये पाळली जाते. तेलीचेरी शेळीचे पालन (Goat Farming) हे प्रामुख्याने दूध आणि मांस उत्पादन अशा दोन्हीसाठी केले जाते. कारण ती अधिक दूध देण्यासह अधिक प्रजननक्षम आहे.
  2. ब्लॅक बंगाल बकरी : ब्लॅक बंगाल शेळी ही मूळची बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पूर्व आणि उत्तर-पूर्व भागातील आहे. ब्लॅक बेंगाल शेळीची जात तिच्या मांसाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय चामडे आणि उच्च प्रजनन क्षमता असल्याने संतती निर्माण करण्याची क्षमता तिची अधिक आहे. तिचा रंग सहसा काळा असतो. किंवा मग ती तपकिरी, राखाडी आणि पांढऱ्या रंगात देखील आढळते.
  3. जमुनापरी शेळी : जमुनापारी शेळीची जात (Goat Farming) भारतीय उपखंडात आढळते. या प्रजातीच्या शेळीच्या उगम उत्तर प्रदेशातील जमुना नदीपासून झाला आहे. जमुनापारी शेळी इंडोनेशियात आयात केली जाते. या प्रजातीची शेळी प्रामुख्याने मांस आणि दुधासाठी पाळली जाते. ती प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांमध्ये आढळते. या जातीच्या शेळीच्या मानेवर आणि डोक्यावर हलके तपकिरी ठिपके दिसतात.
  4. सिरोही शेळी : सिरोही शेळीचे मुळस्थान राजस्थान असून, ती लहान ते मध्यम आकाराची असते. या जातीच्या शेळीचे वजन मादीसाठी 25 ते 30 किलो आणि नरांसाठी 50 किलो असते. वर्षातून दोनदा, सिरोही शेळ्या पिलांना जन्म देतात. त्यामुळे या प्रजातीच्या शेळ्या प्रजनन आणि मांस उत्पादन दोन्हीसाठी योग्य आहेत.
  5. बारबारी शेळी : बारबारी शेळी प्रामुख्याने पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत आढळते. भारतातील पुरोहितांनीच सुरुवातीला या जातीच्या नर आणि मादीची ओळख करून दिली. शेळीची ही जात सध्या उत्तर प्रदेशच्या शेजारच्या आग्रा, मथुरा आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
  6. उस्मानाबाद शेळी : उस्मानाबाद शेळी ही मूळची महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. उस्मानाबाद शेळ्या औरंगाबाद, लातूर, सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतर भागात आढळतात. उस्मानाबादी शेळ्या आकाराने मोठ्या असतात. या जातीच्या शेळ्या काळ्या रंगाच्या असतात. अथवा त्यांच्या शरीरावर पांढरे तपकिरी किंवा ठिपकेदार रंग आढळतात.
  7. बीटल शेळी : बीटल बकरी पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये आढळते. परंतु गुरदासपूर, अमृतसर आणि फिरोजपूर या पंजाबी जिल्ह्यांमध्ये ती अधिक प्रमाणात आढळून येते. बीटल शेळ्या मांस आणि दूध उत्पादन दोन्हीसाठी पाळल्या जातात. या जातीच्या शेळ्यांना लांब पाय, लांब लोंबकळलेले कान, लहान पातळ शेपटी आणि मागे वाकलेली शिंगे असतात.
  8. सानेन शेळी : सानेन शेळी ही मूळची स्वित्झर्लंडमधील सानेन व्हॅली येथील आहे. व्यावसायिक शेळीपालनात (Goat Farming) प्रजननासाठी सानेन शेळी हा सर्वोत्तम पर्याय मानली जाते. ती प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या भागात पाळली जाऊ शकते. छोटेखानी शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सानेन शेळी जात हा एक उत्तम पर्याय आहे.
error: Content is protected !!