Gokul Milk : यंदाच्या उन्हाळ्यात गोकुळच्या दूध संकलनात 2 लाख 37 हजार लिटरने वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा उन्हाळा शेतीसह दूध उत्पादकांसाठी (Gokul Milk) खूप तापदायक ठरला आहे. विशेष म्हणजे वाढलेली उष्णता आणि चाऱ्याची कमतरता यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दूध उत्पादनात मोठी घट होते. प्रामुख्याने दरवर्षी मार्च ते मे हा कालावधी दूध उत्पादनात घट होण्यासाठी ओळखला जातो. मात्र, असले तरी यंदा गोकुळ दूध संघाच्या उन्हाळ्यातील दूध संकलनात 2 लाख 37 हजार 881 लिटरने वाढ नोंदवली गेली आहे. अर्थात यंदा गोकुळच्या दूध (Gokul Milk) संकलनात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, याउलट संकलात वाढ नोंदवली गेली आहे.

20 लाख लिटर दूध उत्पादनाचे लक्ष्य (Gokul Milk Production Increase In Summer Season)

कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या गायीच्या दुधात (Gokul Milk) यंदा उन्हाळ्यात 1 लाख 70 हजार 502 लिटर आणि म्हशीच्या दुधात 67 हजार 379 लिटर वाढ झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत गाय आणि म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहन दिल्याने आणि जनावरांसाठी आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. गोकुळचे सध्याचे दररोजचे दूध संकलन 15 लाख 29 हजार 302 लिटर आहे. आणि हे लक्ष्य 20 लाख लिटर दूध क्षमतेपर्यंत वाढवण्याचे गोकुळचे लक्ष्य आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर सरासरी 33 रुपये दिला जातो, जो इतर संघांपेक्षा जास्त आहे.

संघांच्या प्रयत्नांना यश

दरम्यान, गोकुळ दूध (Gokul Milk) उत्पादकांसाठी विविध योजना राबवत आहे. म्हैस दूध वाढीसाठी अनुदान आणि गायीच्या दुधाला गोकुळकडून चांगला दर दिला जात आहे. याशिवाय सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांकडून दूध उत्पादन वाढीसाठी सातत्याने होणाऱ्या प्रयत्नांमुळे दूध संकलनात वाढ झाली आहे. हे यश निश्चितच दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठीही फायदेशीर ठरेल. असे गोकुळने अधिकृतरित्या म्हटले आहे. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख सहकारी दूध उत्पादक संघ आहे. गोकुळ शेतकऱ्यांकडून दूध गोळा करतो आणि ते प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थ बनवतो. गोकुळ आपल्या उत्तम दर्जाच्या दुग्धजन्य पदार्थांसाठी ओळखला जातो.

error: Content is protected !!