Gokul Milk : ‘या’ जिल्ह्यात ‘गोकुळ’ दूध संघ उभारणार सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील आघाडीचा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ (Gokul Milk) अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अठरा एकर परिसरात भव्य सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. 33 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघाकडून उभारला जाणार आहे. 31 जुलै 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे गोकुळ दूध उत्पादक संघाचे लक्ष्य असून, ऑगस्ट 2024 पासून त्यातून प्रत्यक्षात वीज निर्मिती (Gokul Milk) सुरू होणार असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे.

करमाळ्यातील जागेची निवड (Gokul Milk Sangh Solar Power Project)

हा प्रकल्प उभारण्यासाठी दूध उत्पादक संघ गोकुळकडून करमाळा तालुक्यातील दिंडेवाडी गावाजवळ 18 एकर जागेची खरेदी करण्यात आली आहे. या प्रकल्पाला लागूनच पुणे येथील सार्जन रिऍलिटी प्रा. लि. ही कंपनीने देखील आपला सौरऊर्जा प्रकल्प सुरु केला आहे. गोकुळच्या या प्रकल्पामध्ये निर्माण होणऱ्या सौरऊर्जेमुळे संघांची वीज बिलापोटी साडे सहा कोटी रुपयांची रक्कम वाचणार आहे. अर्थात संघाने केलेली या प्रकल्पसाठीची गुंतवणूक केवळ पाच वर्षामध्ये वसूल होणार आहे. असेही दूध उत्पादक संघ गोकुळने म्हटले आहे.

काटकसरीचे धोरण

गोकुळ दूध उत्पादक संघाने विविध माध्यमातून बचतीचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये बचत करता येईल? याचा विचार पुढे आल्यानंतर वीज बिलांच्या बचतीसाठी सौर उर्जेचा पर्याय समोर आला. यातूनच मग सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपयुक्त अशा भौगोलिक स्थितीचा सविस्तर अभ्यासाचा अहवाल अभियांत्रिकी विभाग प्रमुखांकडून घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प उभारण्याचे ठरले आहे. असे गोकुळ दूध उत्पादक संघाने प्रकल्पाबाबतच्या परिपत्रकात म्हटले आहे.

महामंडळाला विकणार वीज

‘गोकुळ’कडून प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ओपन ॲक्सेस स्कीममधून ही सौरऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण केलेली सौरऊर्जा ही राज्य वीज महामंडळाला दिली जाणार आहे. त्याबदल्यात महामंडळाला गोकुळच्या वीज बिलांचा दर कमी करणार आहे. सध्या दूध संघाला वर्षाकाठी सरासरी १३ कोटी रुपये इतका वीज बिलाचा खर्च इतका येतो. त्यामुळे यात बचत होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!