सरकारचा धडाकेबाज निर्णय! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला दिली मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government GR : राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विविध अपघात होत असतात. त्यामध्ये विशेषतः पाण्यात बुडून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु होतो किंवा अपंगत्व येते. त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडते. या अपघातामध्ये मदत म्हणून अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना राबविली जात होती.

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

मात्र या योजनेमध्य विम्याचे दावे वेळेत न निकाली काढणे, दावे मंजूर न करणे, विमा प्रकरणे नाकारणे या त्रुटींमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये सुधारणा करून एप्रिल 2023 पासून “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” ही योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे?

 • ज्याच्या नावावर जमिन आहे, असा कोणताही शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
 • ज्यांच्या नावावर शेतजमिन नाही किंवा ज्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर नाही. परंतु ती व्यक्ती सातबारा धारक शेतकरी कुटुंबातील असेल तर अशा कुटुंबातील एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
 • अर्जदार शेतकऱ्याचे किंवा कुटुंबातील सदस्याचे वय हे 10 वर्ष ते 75 वर्ष या दरम्यान असले पाहिजे.

इतकी मिळणार मदत

अ.क्र. अपघाताची बाब आर्थिक साहाय्य
१ अपघाती मृत्यू रुपये 2,00,000/-
२ अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे रुपये 2,00,000/-
३ अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे रुपये 2,00,000/-
४ अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे रुपये 1,00,000/-

या अपघातात मिळणार लाभ

1) रस्ता किंवा रेल्वे अपघात
2) पाण्यात बुडून मृत्यू
3) जंतुनाशक हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा
4) विजेचा धक्का बसल्याने अपघात
5) अंगावर विज पडून होणारा मृत्यू
6) खून
7) उंचावरून पडून झालेला अपघात
8) सर्पदंश किंवा विंचूदंश
9) नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या
10) जनावरांच्या हल्ल्यामुळे/ किंवा चावल्यामुळे जखमी किंवा मृत्यू
11) बाळंतपणातील मृत्यू
12) दंगल

या गोष्टी किंवा अपघात अपात्र असतील

 1. नैसर्गिक मृत्यू
 2. योजना सुरू होण्याआधी आलेले अपंगत्व
 3. आत्महत्येचे प्रयत्न किंवा स्वतःला जखमी करून घेणे
 4. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करून झालेला अपघात
 5. अंमली पदार्थांच्या अंमलाखाली झालेला अपघात
 6. भ्रमिष्ठपणा
 7. शरीरांतर्गत अंतस्राव
 8. मोटार शर्यतीतील अपघात
 9. युद्ध
 10. सैन्यातील नोकरी

अर्ज कुठे करावा

 • शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करायचा आहे. त्यामध्ये अपघाताविषयी सविस्तर अर्ज व माहिती लिहणे आवश्यक आहे.
 • स्वतःबद्दलची माहिती, मयताचे नाव, त्यांच्यासोबतचे नाव, मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण, तसेच अपघातात मृत्यू झाला की अंपगत्व याबाबतही माहिती लिहून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेंतर्गत लाभ मिळावा, असे त्या अर्जामध्ये नमूद करायचे आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

• ७/१२ उतारा
• मृत्यूचा दाखला
• शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
• शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीकरिताकरीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्रा आधारे ओळख / वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे.
• प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल
• अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे

error: Content is protected !!