Goverment Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन शेततळ्यांसाठी 46 कोटींचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Goverment Scheme : केंद्र आणि राज्य सरकार सतत शेतकऱ्यांच्या (Farmer ) फायद्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. राज्य सरकारची अशीच एक योजना आहे जिचे नाव मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना असे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आता मागेल त्याला शेततळे दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांना शेततळे घेऊन पाण्याची गरज भागवता येत आहे.

सरकारी योजनेला मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

राज्यात १०२३ शेततळ्यांसाठी साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. तसेच ४६ कोटी रुपये वेगवेगळ्या जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या राज्यात पावसाने हजेरी लावल्याने नवीन शेततळ्यांची खोदाई थांबली असून दिवाळीनंतर या योजनेला पुन्हा गती मिळेल. यासाठी शेतकऱ्यांकडून १७०० शेततळ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी ५०० शेततळ्यांचे अनुदान अदा करण्यास मंजुरी देण्यात आले आहे. (Goverment Scheme )

तुम्हाला जर अगदी सोप्या पद्धतीने सरकारी योजनांची माहिती मिळवायची असेल तर आत्ताच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळेल. फक्त सरकारी योजनाच नाही तर बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी या सर्व गोष्टींची अगदी मोफत माहिती मिळेल.

दरम्यान, या योजनेचा कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांच्याकडून आयुक्तालयापासून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाठपुरावा केला जात आहे. शेततळ्यांची खोदाई करण्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. या योजनेचा सध्या शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत राज्यात शेततळ्यासाठी ५५ हजार शेतकऱ्यांना सोडत लागली असून यापैकी १५ हजार शेतकऱ्यांनी तळे खोदाईची तयारी दर्शविली आहे.

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी अर्जदार शेतकऱ्‍यांकडे स्वत:च्या नावावर कमीत कमी ०.२० हे. क्षेत्र असणे गरजेचे आहे. परंतु क्षेत्रधारणास जास्तीत जास्त मर्यादा नाही. तुम्ही महा ई-सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता.

error: Content is protected !!