Government Godowns : राज्यात 28 नवीन सरकारी गोदाम बांधली जाणार; 20 कोटींचा निधी मंजूर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेच्या अर्थात नाबार्डच्या पायाभूत ग्रामीण विकास निधी अंतर्गत राज्यात नवीन सरकारी गोदाम (Government Godowns) बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात एकूण 28 सरकारी गोदामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सर्व गोदामांसाठी उर्वरित एकूण 20 कोटी 4 लाख 46 हजार इतका निधी वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा जीआर (शासन निर्णय) राज्य सरकारकडून जारी (Government Godowns) करण्यात आला आहे.

9 जिल्ह्यांमध्ये उभारली जाणार गोदामे (Government Godowns In Maharashtra)

राज्यात प्रामुख्याने बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, नागपूर, जळगाव, अमरावती, सांगली, ठाणे या ९ जिल्ह्यांमध्ये 28 ठिकाणी या गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून उभारण्यात येणारी काही गोदामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तर काही गोदामे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून बांधण्यात येणार आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून सरकारी गोदाम बांधकामांची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, असेही सांगण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांना कामाबाबत वेळोवेळी लेखी स्वरूपात सादर करावा, असेही या शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आले आहे.

‘ही’ आहेत 28 ठिकाणे

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येणाऱ्या गोदामांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पोखरी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, भंडारा जिल्ह्यातील पळसगाव, कुंभली, मासळ, बारव्हा, ओपारा, मोहरणा, मुरमाडी/ तुपकर, राजेगाव, नांदेड जिल्ह्यातील नायगाव ही गोदामे बांधली जाणार आहे. तर वखार महामंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या गोदामांमध्ये नागपूर जिल्ह्यातील मौदा पारशिवनी, कुही, जळगाव जिल्ह्यातील मोहाडी, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, चाळीसगाव, सावदा, सारोळा, अमळनेर, चहार्डी, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, तिवसा तर सांगली जिल्ह्यातील तडसर आदी ठिकाणी नवीन गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी हा 20 कोटी 4 लाख 46 हजार इतका निधी वितरित करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202403281529515106.pdf)

error: Content is protected !!