शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! क्रॉपसॅप प्रकल्पासाठी 25 कोटींचा निधी मंजूर, शेतकऱ्यांना मिळणार मोफत रोग-कीड व्यवस्थापन सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government GR : सध्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Important News For Farmer) राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या दृष्टीने कीड- रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अंमलबजीस राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी रु. 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Agriculture News)

रोग व किडी नियंत्रणासाठी मिळणार मार्गदर्शन

पिकांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव होत असतो. रोग-कीड नियंत्रणासाठी योग्य वेळी सल्ला व मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने राज्यात कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजना म्हणजेच ‘क्रॉपसॅप’ योजना राबवली जाते. यामध्ये पिकावर पडणाऱ्या रोग व किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून विश्लेषण करून शेतकऱ्यांना ॲप व एसएमएस द्वारे सल्ला व मार्गदर्शक केले जाते. (Latest Marathi News)

17 पिकांचा होणार समावेश

या योजनेत सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, मका, ज्वारी व ऊस तसेच फळपिके आंबा, डाळिंब केळी, मोसंबी संत्रा, चिकू, काजू, भेंडी व टोमॅटो अशा एकूण 17 पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

निविष्ठांचे वाटप

शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढवून त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना फेरोमेन सापळे व ट्रायकोग्रामा आदी निविष्ठांचे वाटप केले जाते. खरिप हंगामात पावसामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. असतो. रोग-किडींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी जर योग्यवेळी पिकावरील रोग व किडींचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात होणारी घट किंवा नुकसान टाळता येऊ शकते.

error: Content is protected !!