Government Scheme : ‘या’ कामासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 50 लाख रुपये; जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आजकालची तरुण पिढी नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करत आहेत. अनेक जण व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. तुम्ही जर योग्य नियोजन आणि व्यवसायाच्या बाजाराची संपूर्ण माहिती घेतली तर तुम्ही देखील व्यवसाय करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. अनेकजण शेती सोबत शेळीपालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय करतात. आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही देखील ही शेती पूरक व्यवसाय करू शकता यासाठी सरकार तुम्हाला मदत करत आहे.

तुम्हालाही व्यवसाय करायची इच्छा असेल मात्र तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्हाला सरकार यासाठी मदत करणार आहे. या मदतीचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. शेतीपूरक व्यवसायासाठी सरकार अनुदान देत आहे. सरकारने यासाठी एक योजना सुरू केली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षण अभियान असे या योजनेचे नाव आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 50 लाखांची मदत

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुखाद्य, मेंढीपालन, वैरण, बियाणे त्याचबरोबर मुरघास निर्मिती यांसारखा व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सरकार देत आहे. याच्या माध्यमातून शेतकरी एक उद्योजक बनू शकतील. माहितीनुसार, केंद्र सरकारने 12 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित केल्या असून त्यानुसार सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे.

या ठिकाणी मिळेल सर्व सरकारी योजनांची माहिती

आपल्याकडे असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना अजूनही काही सरकारी योजनांची माहिती नाही. मात्र आता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आम्ही तुमच्यासाठी एक खास बनवले आहे. ज्याचं नाव आहे hello krushi या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सर्व सरकारी योजनांची माहिती घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात? यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? याबाबतची सर्व माहिती तुम्हाला काही मिनिटातच मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच आपले hello krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

या योजनेसाठी पात्रता काय

कोणतीही योजना म्हटलं की त्यासाठी पात्रताही असतेच. तसेच या योजनेसाठी देखील पात्रता आहे. सहकारी दूध उत्पादक संस्था, व्यक्तिगत व्यावसायिक शेतकरी, उत्पादक संस्था, स्वयंसहायता बचत गट, खाजगी संस्था, शेतकरी सहकारी संस्था, आणि स्टार्टअप ग्रुप यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

अर्ज कसा करायचा?

तुम्हाला जर या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही https://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर भेट देऊन त्या ठिकाणाहून ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यामध्ये पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, प्रकल्प अहवाल, वीज बिलाची प्रत अशा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळून जाईल.

error: Content is protected !!