मोठी बातमी! 15 ऑगस्टपर्यंत कांद्याचे सरसकट अनुदान मिळणार; राज्य सरकारने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Government Subsidy : मागच्या काही दिवसापासून कांद्याचे दर खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) खूप चिंतेत आहेत. कांद्याचे भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी वखारी मध्ये कांदा साठवणूक करून ठेवला होता. मात्र अद्यापही कांद्याचे दर वाढले नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळावी म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांनी याबाबतचे फॉर्म भरून देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान अजुन मिळाले नाही. मात्र आता यासंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर बाजार समितीसह इतर ठिकाणी विक्री केलेल्या कांद्याला देखील अनुदान देण्याबरोबरच ईपीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे . याबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे. Government Subsidy

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात उपस्थित करत आहेत. याचवेळी आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहामध्ये कांदा अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतीश पाटील यांनी या प्रश्नावर मुद्दे उपस्थित करत शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळावे अशी मागणी केली होती. सरकारच्या अनुदानाच्या घोषणेला तीन महिने झाले असले तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही हाच मुद्दा धरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. दरम्यान, येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रलंबित अनुदानाची रक्कम जमा केली जाईल अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बाजारभाव इथे चेक करा

शेतकऱ्यांनो तुम्हाला कांद्याचे बाजार भाव चेक करायचेत तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक खास बनवले आहे. त्याचं नाव आहे Hello Krushi या ॲप मध्ये तुम्हाला रोजच्या रोज बाजार भाव चेक करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर हे ॲप इंस्टॉल करायला विसरू नका. लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!