Grain Cleaning Machine: शेतकरी ग्रुपमध्ये करत आहेत धान्य स्वच्छ करणाऱ्या यंत्राचा वापर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आधुनिक यंत्र (Grain Cleaning Machine) वापरून दिवसेंदिवस शेतकरी कमी वेळात जास्त काम कसे करायचे याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे शेतीत यांत्रिकीकरण वाढत चालले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे धान्य स्वच्छ करणारे यंत्र (Grain Cleaning Machine).

खरीप (Kharif Season) व रब्बी (Rabi Season) हंगामाच्या सुगीत गहू, ज्वारी व इतर धान्य (Food Grains) शेतातून मळणी करून घरी आणल्यानंतर तेथून महिलांच्या कष्टाचा प्रवास सुरू होतो. यामध्ये प्रामुख्याने धान्य वाळविणे, त्यातील मातीचे खडे, कुड्या, बोंडे वेचणे यामध्ये संपूर्ण उन्हाळा हीच कामे ( Agriculture Field Work) महिलांच्या डोक्यावर बसत असतात.

यावर्षी मात्र धान्य स्वच्छ (Grains Cleaning) करणाऱ्या यंत्राने महिलांना दिलेला आहे. हे यंत्र (Grain Cleaning Machine) गावोगावी ट्रॅक्टरला जोडून फिरत आहे. त्यामुळे धान्य स्वच्छ करणाऱ्या यंत्राची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शेतकरी गावोगावी ग्रुप करून आपले धान्य स्वच्छ करून घेत आहेत. शेतकरी एकत्रित येऊन हे काम करत असल्यामुळे त्यांच्या खर्चात बचत होत आहे.  

हे यंत्र दिवसाला अंदाजे 5 हजार किलो म्हणजे 50 क्विंटल धान्य स्वच्छ करून देत आहे, त्यामुळे एका क्विंटलला सर्वसाधारण 125 रुपये खर्च येत असला तरी वेळ आणि श्रम वाचत असल्यामुळे महिला वर्गही आनंदी आहे. ते मोठ्या प्रमाणात या यंत्राला पसंती देत आहेत.  

मजुरांच्या तुटवड्यामुळे (Labor Shortage) शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. त्यामुळे यंत्रपद्धतीकडे शेतकरी वर्ग वळला आहे. महिलांनाही यंदाच्या सुगीला थोडाफार आराम मिळाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे (Grain Cleaning Machine).

error: Content is protected !!