Grains Prices : अन्नधान्याच्या वाढत्या किमती सरकारसाठी ठरतायेत डोकेदुखी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील वाढत्या अन्नधान्याच्या किमती (Grains Prices) सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून सध्या विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून अल्प दरामध्ये तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ आणि कांद्याची विक्री केली जात आहे. मात्र आता सरकारकडून देशातील प्रमुख शहरांमधील मेट्रो स्थानकांवर अन्नधान्य विक्री केंद्र उभारली जाणार आहे. या केंद्रावर स्वस्त दरांमध्ये अन्नधान्य विक्री केली जाणार आहे.

सरकारकडून ही विक्री राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघामार्फत (एनसीसीएफ) केली जाणार आहे. एनसीसीएफ ही संस्था देशातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची (Grains Prices) खरेदी करते. मात्र आता वाढते अन्नधान्याचे दर पाहता सरकारकडून या संस्थेला अन्नधान्य, डाळी, मसाले, खाद्यतेल आणि अन्य कृषी संबंधित वस्तूंच्या विक्रीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार दिल्ली मेट्रो स्थानकावर 20 अन्नधान्याची स्टोअर्स लावले जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून खूप कमी प्रमाणात लोकांना अन्नधान्य विक्री होत असल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी (Grains Prices Increases In India)

देशातील सामान्य ग्राहकांना तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ आणि कांद्याची विक्री अल्प दरात करणे हा योजनेमागील उद्देश असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. त्यासाठी देशातील दिल्लीसह मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू स्थानकावरही एनसीसीएफकडून ही अन्नधान्य विक्री केली जाणार आहे. मात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला ऐन हंगामात योग्य बाजारभाव मिळत नसताना साठेबाजांचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. सरकारकडून खाद्यतेल विक्री सुरु असताना, सोयाबीनचे दर मात्र घसरले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

error: Content is protected !!