हॅलो कृषी ऑनलाईन : हरभरा लागवडीबद्दल (Gram Cultivation) बोलायचे झाल्यास, हरभरा हे हिवाळ्यातल्या मुख्य रब्बी पिकांपैकी एक आहे. त्याची लागवड सप्टेंबरपासून सुरू होत असली, तरी उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते आणि तरीही शेतकरी हरभरा पेरू शकतात. चांगला नफा मिळविण्यासाठी शेतीची योग्य पद्धत जाणून घ्या…
जमीन आणि वाण
बुरशी व क्षार यांचा मुक्त निचरा असलेली सुपीक जमीन हरभरा पिकासाठी योग्य मानली जाते. मातीचे pH मूल्य 6.7-5 च्या दरम्यान असावे. पेरणीसाठी पुसा 544, पुसा 572, पुसा 362, पुसा 372, पुसा 547 या जातींचे 70-80 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरता येते. याशिवाय हरभऱ्याच्या अनेक जाती आहेत.
सुधारित वाण | कालावधी | उत्पादन (किं /हे.) | वैशिष्ट्ये | |
---|---|---|---|---|
विजय | जिरायत :८५ ते ९० दिवस
बागायत :१०५ ते ११० दिवस |
जिरायत प्रायोगिक उत्पादन :१४ ते १५
सरासरी :१४:०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३५ ते ४० सरासरी :२३.०० उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पादन :१६ ते १८ सरासरी :१६.०० |
अधिक उत्पादनक्षमता , मर रोग प्रतिकारक ,जिरायत,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य ,अवर्षण प्रतिकारक्षम ,महाराष्ट्र ,मध्यप्रदेश,गुजरात राज्याकरिता प्रसारित. | |
विशाल | ११० ते ११५ दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पादन:१४ ते १५
सरासरी :१३.०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३५ सरासरी :२०.०० |
आकर्षक पिवळे टपोरे दाने,अधिक उत्पादनक्षमता , मर रोग प्रतिकारक ,अधिक बाजारभाव , महाराष्ट्राकरिता प्रसारित | |
दिग्विज | जिरायत: ९० ते ९५ दिवस
बागायत :१०५ ते ११० दिवस |
जिरायत प्रायोगिक उत्पादन : १४ ते १५
सरासरी :१४.०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३५ ते ४० सरासरी : २३.०० उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पादन : २० ते २२ सरासरी :२१.०० |
पिवळसर तांबूस,टपोरे दाने,मर रोग प्रतिकारक , जिरायत,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य , महाराष्ट्राकरिता प्रसारित. | |
विराट | ११० ते ११५ दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पादन:१० ते १२
सरासरी :११.०० बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३२ सरासरी :१९.०० |
काबुली वाण , अधिक टपोरे दाणे , मर रोग प्रतिकारक , अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित . | |
कृपा | १०५ ते ११० दिवस | बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३२
सरासरी:१८.०० |
जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वन,दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे सर्वाधिक बाजारभाव , महारष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित . | |
पिकेव्हिके -२ | ११० ते ११५ दिवस | बागायत :सरासरी :१६ ते १८ | अधिक टपोरे दाणे असणारा कबुली वाण,महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित | |
पिकेव्हिके – ४ | १०५ ते ११० दिवस | बागायत :सरासरी :१२ ते १५ | जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण , महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित . | |
बिडीएनजी -७९७ | १०५ ते ११० दिवस | जिरायत : १४ ते १५
बागायत :३० ते ३२ |
मध्यम आकाराचे दाणे , मराठवाडा विभागासाठी प्रसारित | |
साकी-९५१६ | १०५ ते ११० दिवस | बागायत प्रायोजिक उत्पादन:३०-३२
सरासरी:१८ -२० |
मध्यम आकाराचे दाणे , मर रोग प्रतिकारक , जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य ,महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात राज्यांकरिता प्रसारित | |
जाकी -९२१८ |
|
बागायत प्रायोगिक उत्पादन :३० ते ३२
सरासरी: १८ ते २० |
पिवळसर तांबूस , टपोरे दाणे,मर रोग प्रतोकारक,जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य , महाराष्ट्रा करिता प्रसारित . |
बीजप्रक्रिया आणि जीवाणूसंवर्धन
बियाण्याची (Gram Cultivation) उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम अ २ ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति केिली बियाण्यास चोळावे. यानंतर १o किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ ते ५ टक्के उत्पादन वाढते.
बियाणे प्रमाण
हरभन्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे (Gram Cultivation) प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७0 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता १oo किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी. के. व्ही. ४ या जास्त टपोच्या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी- वरंब्यावरही चांगला येतो. ९0 सें.मी. रुंदीच्या स-या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी.
खते
सुधारित हरभरयाचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी (Gram Cultivation) करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी) अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटेंश अथवा ५0 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. पीक फुलो-यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १०-१५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
आंतरमशागत
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३0 ते ४५ दिवसात शेत (Gram Cultivation) तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथिलिन या तणनाशकाची २.५ ते ३ लिटर प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
एकात्मिक कोड व्यवस्थापन (घाटे अळी नियंत्रण)
घाटे अळी ही हरभ-यावरील (Gram Cultivation) मुख्य कोड आहे. घाटे अळी ही कोड ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभ-याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १o ते १२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.
हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची (२५ किलो/ हे.) पहिली फवारणी करावी. यासाठी ५ किलो निंबोळी पावडर १o लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी ९o लिटर पाणी टाकावे. असे एकूण १०० लिटर द्रावण २० गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकील (विषाणूग्रासीत अळ्यांचे द्रावण) ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढे दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.