Gram Export: यावर्षी हरभरा निर्यातीत झाली वाढ, जाणून घ्या भविष्यातील अंदाज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी हरभरा डाळीची निर्यात (Gram Export) वाढण्याचे अंदाज आहे. भारत सरकारने (Government) जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार (Gram Production Estimate) सन 2022-23 मध्ये हरभऱ्याचे उत्पादन (Gram Production) सुमारे 136.3 लाख टन होण्याची शक्यता आहे (Gram Export).

हरभरा (Gram) हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणारे आणि खाण्यात येणारे डाळवर्गीय पीक (Pulses Crop) आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनांपैकी 20 टक्के हिस्सा हरभर्‍याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे 90 टक्के योगदान देतात (Gram Export).

भारत हा हरभर्‍याचा प्रमुख उत्पादक (Major Producer of Gram) देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे 70 -75 टक्के इतका आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनांपैकी (Pulses Production) 40 -50 टक्के हिस्सा हरभर्‍याचा आहे. देशभरात हरभर्‍याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरुपात केला जातो.

हरभरा हे रब्बी पीक (Rabi Crop) असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेले हरभरा उत्पादनाचे सन 2022-23 साठीचे नवीन अंदाज मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातील 2021-22 मधील उत्पादन 27.2 लाख टनांवरून सन 2022-23 मध्ये 36.39 लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परंतु मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये हरभरा निर्यात (Gram Export) वाढलेली आहे तर आयात (Gram Import) कमी झालेली आहे.

मार्च ते मे हा हरभर्‍याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष फेब्रुवारी 2023-24 मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली दिसून येत आहे. फेब्रुवारी 2024 (15 फेब्रुवारी 2024 पर्यंत) मध्ये ती 0.5 लाख टन इतकी आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 2.5 लाख टन इतकी होती. ऑक्टोबर 2022 पासून हरभर्‍याच्या किंमती वाढत आहेत. ऑगस्ट 2023 नंतर त्या सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) जास्त आहेत.

मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील हरभर्‍याच्या किमती (एप्रिल ते जून)

एप्रिल ते जून 2021 – रु. 4,844/क्विंटल
एप्रिल ते जून 2022 – रु. 4,525/क्विंटल
एप्रिल ते जून 2023 – रु. 4,810/क्विंटल

सध्याच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत रु. 5335/क्विंटल एवढी आहे. हरभऱ्याची वाढती निर्यात आणि कमी झालेली आयात ही हरभरा उत्पादक शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

error: Content is protected !!