Grapes Export : नाशिकहून नेदरलँड, रोमोनियाला द्राक्ष निर्यात; पहिली खेप रवाना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादक (Grapes Export) शेतकऱ्यांना सध्या मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. आधीच दुष्काळ, त्यात अवकाळी पाऊस आणि मध्यंतरी इस्राईल-पॅलेस्टिन युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागला होता. मात्र नव्याने द्राक्ष पीक उभारी घेत असून, काही प्रमाणात द्राक्ष निर्यात पुन्हा सुरु झाली आहे. नुकतीच 71 कंटेनरमधून 980 टन द्राक्ष निर्यात (Grapes Export) नाशिक जिल्ह्यातून नेदरलँड आणि रोमोनिया या देशांना करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्यात होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

38 हजार द्राक्ष बागांची नोंदणी (Grapes Export From Nashik)

द्राक्ष हे देशाला विदेशी चलन मिळवून देणारे प्रमुख फळपीक आहे. नेदरलँड, युनायटेड किंग्ड्‌म, जर्मनी, लटवीया, डेन्मार्क, स्वीडन, पोर्तुगाल, स्विझर्लंड, पोलंड, बेल्जियम, फिनलेंड, इटली, स्पेन यांसारख्या पश्चिमेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातून द्राक्ष निर्यात केली जातात. मागील वर्षीच्या 20220-23 च्या द्राक्ष हंगामात जवळपास 2 लाख 67 हजार 950 दशलक्ष टन द्राक्ष निर्यात झाली होती. या द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून देशाला 2543 कोटींहून अधिक विदेशी चलन मिळाले होते. मात्र यावर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट मागे हटवण्याचे नाव घेत नाहीये. अशातही आतापर्यंत एपीडाकडे एकूण 38 हजार 432 द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झालेली आहे.

प्रभावी धोरणाची आवश्यकता

द्राक्ष निर्यातीत वाढ झाल्यास द्राक्षाचे दरही टिकून राहतात. निर्यात वाढीमुळे स्थानिक बाजारात योग्य पुरवठा राहून दर स्थिर असतात. अनेकदा द्राक्ष मालाचे उत्पादन एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जादा झाल्याने भाव पडतात. परिणामी प्रभावी आयात-निर्यात धोरण राबविण्याची आवश्यकता असते. आधीच कांदा पीक आणि टोमॅटोत नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दर मिळण्याची संपूर्ण आशा ही द्राक्ष पिकावर असल्याची भावना द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. याशिवाय भारतीय शेतमालाला आणि फळ पिकांना बांग्लादेशात मोठी मागणी असते. परिणामतः केंद्र सरकारने त्या ठिकाणी ही द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली तर द्राक्ष निर्यातीस वाव मिळेल. अशी मागणीही द्राक्ष उत्पादकांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!