Grapes Export : यावर्षी द्राक्ष निर्यात नोंदणी निम्म्याने घटली; अवकाळीचा फटका!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष पिकाच्या निर्यातीसाठी नोंदणी (Grapes Export) करता यावी. यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अन्न आणि निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) आपल्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत (Grapes Export) दरवर्षीप्रमाणे नोंदणी सुविधा सुरु केली आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत राज्यातील केवळ 7 हजार 458 द्राक्ष बागांची नोंदणी एपीडाकडे झाली आहे. जी मागील वर्षी नोंदवल्या गेलेल्या द्राक्ष बागांच्या तुलनेत जवळपास निम्म्याने कमी आहे.

2023-24 यावर्षीच्या हंगामासाठी देशातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी नोंदणी अनिवार्य (Grapes Export) करण्यात आली आहे. त्यासाठी एपीडाने शेतकऱ्यांना ग्रेपनेट हा कॉलम संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. मात्र मागील महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रासह प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यांमध्ये द्राक्ष बागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षांना गारपिटीचा तडाखा बसल्याने, अनेक द्राक्ष बागांनी गुणवत्तापूर्ण द्राक्षाची क्षमता गमावली आहे. त्यामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात केवळ 7 हजार 458 द्राक्ष बागांची नोंदणी एपीडाकडे होऊ शकली आहे. मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या तुलनेत यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक घट नोंदवली गेली आहे.

ऐन जोमात गारपिटीचा फटका (Grapes Export Registrations Fell This Year)

गेल्या वर्षी द्राक्ष हंगामात नाशिक जिल्ह्यातून 6 हजार 796 कंटेनरमधून जवळपास 90 हजार 493 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात करण्यात आली होती. तर देश पातळीवरून 1 लाख 69 हजार 650 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात मागील हंगामात करण्यात आली होती. मात्र यावर्षी ऐन साखर भरण्याच्या तोमात असताना, झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष पिकाला फटका आहे. गारपिटीमुळे मण्यांना तडे गेले असून, अनेक ठिकाणी द्राक्ष बागांनी आपली निर्यातक्षमता गमावलेली आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीचा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत कमीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!