Grapes Farmer : द्राक्ष उत्पादकांना योग्य दर मिळण्यासाठी मोठा निर्णय; वाचा जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील द्राक्ष (Grapes Farmer) उत्पादक शेतकऱ्यांना, त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा. यासाठी सरकारकडून वाईन उद्योग प्रोत्साहन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यामध्ये उत्पादीत केलेले्या व अंतिमतः विक्री झालेल्या वाईनच्या विक्रीवर देय असलेल्या 20 टक्के
मूल्यवर्धित कर भरल्यास त्यापैकी 16 टक्के कराच्या रकमेइतके वाईन प्रोत्साहन अनुदान वाईन उद्योगास दिले जाते. त्यानुसार राज्यातील सर्व वायनरीसला 15 कोटींचे अनुदान राज्य सरकारकडून मंजूर (Grapes Farmer) करण्यात आले आहे. याबाबतचा जीआर (शासन निर्णय) राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

13 प्रलंबित दावे निकाली (Grapes Farmer To Get Fair Rates)

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे (Grapes Farmer) नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीस प्रोत्साहन देणे, सुकामेवा बनवणे तसेच द्राक्षापासून अधिक लाभदायी पर्यायी उत्पादनांची निर्मिती व्हावी. त्यामुळे 2001 पासून राज्यातील द्राक्ष पिकावर आधारीत वाईन उद्योगास प्रोत्साहन म्हणून राज्य सरकारने द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण 2001 पासून राबविले जात आहे. त्यानुसार वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2020-21, 2021-22 व 2022 -23 या तीन वर्षांतील 25 दाव्यांपैकी 14 कोटी 99 लाख 45 हजार 215 रुपयांचे एकूण 13 प्रलंबित दावे निकाली काढण्यास या जीआरद्वारे (शासन निर्णय) मान्यता देण्यात आली आहे.

‘या’ 13 वायनरीजला मिळणार अनुदान

राज्य सरकारच्या जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे 13 वायनरीला अनुदान देण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने फ्रेटली वाईन्स सोलापूर, ओकवूडड वायनरी नाशिक, गुड ड्रॉप वाईन नाशिक, सोमंदा वाइन यार्ड्स अँड रिसॉर्ट नाशिक, सुला विनियार्ड नाशिक, निरा व्हॅली ग्रेप वाईन्स नाशिक, यॉर्क वायनरी नाशिक, हिल क्रेस्ट फुड्स अँड वाईन्स पुणे, फ्रेटली वाईन सोलापूर, विन लँड वाइन्स कंपनी नाशिक, ग्रेप्सी वाईन्स अँड बेवरेज पुणे, ग्रेप सिटी वायनरी सहकारी संस्था सांगली अशा 13 वायनरी कंपन्यांचा यात समावेश आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202403221721279810.pdf)

error: Content is protected !!