Grape Management: द्राक्ष पिकात मणी वाढ अवस्थेतील व्यवस्थापन जाणून घ्या द्राक्ष तज्ज्ञांकडून!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Grape Management: काही भागात द्राक्ष पीक मणी वाढीच्या अवस्थेत आहे. वेगवेगळ्या साईझच्या मण्यांसाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची फवारणी तसेच ड्रीप मार्फत नियोजन (Grape Management) करणे गरजेचे असते. यावेळी द्राक्ष वेलीची चांगली वाढ होऊन उत्तम आणि निरोगी मणी तयार होण्यासाठी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी द्राक्ष पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन (Grape Management) जाणून घेऊ या.

  • मणी सेट केल्यानंतर, सुरुवातीला 2 किलो फॉस्फोरिक अॅसिड आणि त्यानंतर 5 किलो 12-61- 0 प्रती एकर वापरावा.
  • द्राक्ष मणीचा आकार 2-8 मिमी असल्यास 2 ग्रॅम कॅल्शियम क्लोराईड / 0.5 ग्रॅम कॅल्शियम चीलेट प्रती लिटर(Grape Management) फवारणी करावी. चांगल्या शोषणासाठी जिब्रेलिक अॅसिडची (शक्यतो पुढच्या दिवशी) लगेच फवारणी करावी.
  • बेरीचा आकार 8-10 मिमी असल्यास मॅग्नेशियम सल्फेट @ 10kg/एकर ड्रिपद्वारे द्यावे. किंवा पोटॅशियम सल्फेट @ 3 ग्रॅम/एकर फवारणी करावी.
  • द्राक्ष बेरीला 8-10 मिमी साईझ प्राप्त झाल्यानंतर नत्राचा पुरवठा करावा (Grape Management) यासाठी अमोनियम सल्फेट 25 किलो /एकरच्या रूपात 4 भागांमध्ये चुनखडीयुक्त जमिनीत आणि युरिया १५ किलो/एकर इतर जमिनीत 3 भागांमध्ये द्यावे. पुढील दोन आठवडे 3-4 भागांमध्ये सल्फेट ऑफ पोटॅश किंवा  0-0-50 25 किलो /एकरसह द्यावे.
  • माती चुनखडीयुक्त असल्यास छाटणीनंतर 65-70 दिवसांनी झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट @ 5 किलो/एकर वापरावे.
  • बुरशीजन्य भुरी रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. द्राक्षाच्या वेलात पोटॅशियमची पातळी वाढविण्यासाठी (Grape Management) 4-5 ग्रॅम  सल्फेट ऑफ पोटॅश / लि. पानांवर फवारणी  करावी. आणि ठिबकद्वारे सल्फेट ऑफ पोटॅश @ 15 किलो /लिटर याप्रमाणे द्यावे. (मागील २० दिवसांपासून सल्फेट ऑफ पोटॅश दिले नसल्यास)

परिपक्व अवस्था ते काढणी अवस्था (Grape Management)

  • सल्फेट ऑफ पोटॅश किंवा 0-0-50 (Grape Management) @ 25 किलो/एकर 3-4 भागांमध्ये पुढील दोन आठवड्यांसाठी वापरावे.
  • चुनखडीयुक्त जमिनीत मॅग्नेशियम सल्फेट @ 4 ग्रॅम /लिटर फवारणी करावी.

कॅनोपी व्यवस्थापन (Canopy Management)

  •  घडांमध्ये मणी तयार झाल्यानंतर, मण्याची विरळणी करणे खूप महत्वाचे असते, यामुळे मण्यांची वाढ होते.
  • ढगाळ वातावरणातील बदलामुळे फुलांची गळ होवू शकते, यासाठी शूट पिंचिंग (Shoot Pinching) त्वरित करावे. यामुळे वेलीस ताण बसणार नाही. व फुलांची गळ कमी होण्यास मदत होईल.
  • द्राक्षबागेत मधोमध पाणी उतरत असताना, तापमान ६ ते ७ 0 C असेल तर  पिंक बेरीचा प्रादुर्भाव होवू शकते. यावर उपाय म्हणून बागेला पाणी द्यावे, बागेत आग लावावी, घड कागदाने झाकून घ्यावे.
  • सकाळच्या वेळी दव जास्त प्रमाणात पडत असल्यास बागेतील आर्द्रता वाढून केवडा  रोगाची पररस्थिती उदभवू शकते, यासाठी जैविक औषधांची फवारणी करावी
  • वेलींवरील फुटी तारांवर व्यवस्थित बांधून घ्यावात जेणेकरून वेलीमध्ये हवा खेळती राहील व वेलीची वाढ चांगली होईल (Canopy Management). यामुळे वेलीमध्ये सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात राहील व मण्यांच्या वाढीस आणि गोडी उतरण्यास मदत होईल.

Source- National Research Centre for Grapes, Manjari, Pune

error: Content is protected !!