Grapes Variety : ‘पूसा नवरंग’ द्राक्ष वाण; ज्यूस, वाईनसाठी प्रसिद्ध, मिळते भरघोस उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक व सांगली जिल्हा द्राक्ष (Grapes Variety) उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इतकेच नाही राज्यातील अन्य भागांमध्येही कमी अधिक प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यंदा अवकाळी पाऊसाने आणि वातावरणाने साथ दिली नसली तरी शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. द्राक्ष शेतीतून अधिक नफा मिळवण्यासाठी, त्याची अधिक उत्पादन देणारी जात निवडणे खूप गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण द्राक्षाच्या एका आगळ्यावेगळ्या द्राक्ष जातीबद्दल (Grapes Variety) जाणून घेणार आहोत. जी ज्यूस आणि वाईन बनवण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. ज्यामुळे तिला अधिक मागणी असते.

पूसा नवरंग वाणाची वैशिष्ट्ये? (Grapes Variety Pusa Navrang)

पूसा नवरंग असे या द्राक्ष वाणाचे (Grapes Variety) नाव असून, भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून (आयसीएआर) तिची निर्मिती करण्यात आली आहे. हे द्राक्ष वाण उत्पादन देण्यासह लवकर काढणीला येते. या वाणाच्या झाडाला येणाऱ्या द्राक्षांचा आकार हा मध्यम असतो. पूसा नवरंग ही द्राक्षाची संकरित जात असून, तिचे फळ हे बीजरहित असते. याशिवाय या वाणाच्या द्राक्षांचा रंग हा काळा असतो.

या द्राक्ष वाणाचा उपयोग हा ज्यूस आणि वाईन बनवण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात याच द्राक्ष वाणाच्या मदतीने पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने पूसा नवरंग आणि फ्लेम सिडलेस जातीच्या संकरण प्रक्रियेतून मांजरी मेडिका ही जात विकसित केली आहे. जी राज्यात ज्यूस निर्मितीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

अन्य महत्वाचे द्राक्ष वाण

थॉमसन सिडलेस, तास-ए-गणेश, सोनाका, माणिक चमन, शरद सिडलेस, फ्लेम सिडलेस व रेडग्लोब ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि अधिक उत्पादन मिळवून देणारी द्राक्ष वाण आहेत. तर अलीकडे नाशिक येथील सह्याद्री फार्म्स या शेतकरी उत्पादक संस्थेकडून ‘आरा’ हे द्राक्ष वाण विकसित करण्यात आले आहे. हे देखील उत्पादन मिळवून देणारे वाण आहे. या वाणाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे इतर सर्व वाणांपेक्षा त्याला निर्यातीसाठी मागणी असल्याने, त्याला अधिकच दर मिळतो.

महाराष्ट्रात 70 टक्के उत्पादन

भारतीय फळबाग शेतीमध्ये द्राक्ष फळपिकाला मोठे स्थान आहे. भारतातील महाराष्ट्र हे आघाडीवरील द्राक्ष उत्पादक राज्य असून, राज्यात देशातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 70 टक्के द्राक्ष उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. त्यातही राज्यातील नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय देशातील पंजाब, राजस्थान हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये देखील द्राक्ष उत्पादन होते.

error: Content is protected !!