Green Chilli Farming : ‘912 गोल्ड’ वाणाची लागवड करा; हिरव्या मिरचीतून मिळेल अधिक उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रीयन आहारासह भारतीय आहारात हिरव्या मिरचीला (Green Chilli Farming) मोठे स्थान दिले जाते. हिरवी मिरची ही केवळ आहारातील मुख्य घटक नाही तर त्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. हिरव्या मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात केली जाते. तिला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे हिरव्या मिरचीच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात कमाई केली जाऊ शकते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कमी खर्चात बियाणे उपलब्ध व्हावेत. यासाठी भारतीय बियाणे महामंडळाकडून (Green Chilli Farming) स्वस्तात ऑनलाईन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हिरव्या मिरचीचे ‘912 गोल्ड’ वाण (Green Chilli Farming 912 Gold Variety)

हिरव्या मिरचीच्या (Green Chilli Farming) ‘912 गोल्ड’ या वाणाचे बियाणे तुम्ही घरबसल्या मागवू शकतात. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी भारतीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) ओएनडीसी अर्थात डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क सुविधा बियाणे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकरी एनएससीच्या माध्यमातून ऑनलाईन बियाणे खरेदी करू शकतात. या ठिकाणी अन्य प्रकारची बियाणे देखील स्वस्तात खरेदी करू शकतात.

काय आहेत या वाणाची वैशिष्ट्ये?

हिरव्या मिरचीचे ‘912 गोल्ड’ हे वाण हायब्रीड असून, त्याची झाडे मजबूत असतात. फळे अर्थात मिरच्या हलक्या हिरव्या रंगाच्या आणि 8-10 सेंमीपर्यंत लांब आहेत. या वाणाची मिरची पाहिजे तितकी तिखट नसते. त्यामुळे सौम्य आहारातील व्यक्तींसाठी प्रभावी मानले जाते. तसेच, या वाणाची लागवड मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये केली जाते.

किती आहे किंमत?

तुम्हालाही हिरव्या मिरचीच्या सुधारित वाणापासून हिरव्या मिरचीची शेती करायची असेल. तर तुमच्यासाठी 912 सुवर्ण जातीच्या संकरित मिरचीची लागवड करू शकतात. या वाणाचे 10 ग्रॅमचे पॅकेट राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने 40 टक्के सवलतीसह केवळ 175 रुपयांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तुम्ही हे बियाणे घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करू शकतात.

हिरव्या मिरचीच्या (Green Chilli Farming) 912 गोल्ड या वाणाची लागवड वर्षभरात कोणत्याही कालावधीत केली जाऊ शकते. हिरव्या मिरचीची शेती करताना त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण त्यावर मावा, तुटतुडे, पांढरी माशी, घुबडा अशा रोगांच्या सर्वाधिक प्रादुर्भाव होतो. याशिवाय आपल्या घरी हिरव्या मिरचीची रोपे तयार करू शकतात. रोपांची लागवड करताना त्यात कमीत कमी दोन फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक असते. आणि दोन बेडमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर असावे लागते. ज्यामुळे पिकामध्ये हवा खेळती राहून, रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

error: Content is protected !!