Green Chilli Farming : ‘ही’ आहे पाच प्रमुख हिरवी मिरची उत्पादक राज्य; पहा… महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय आहारात हिरव्या मिरचीचा (Green Chilli Farming) विशेष समावेश असतो. महाराष्ट्रात तर ग्रामीण भागात हिरव्या मिरचीचा ठेचा शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय दैनंदिन आहारात जवळपास अनेक गोष्टींमध्ये हिरवी मिरची आवर्जून वापरली जाते. मात्र, या हिरव्या मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे पहिले पाच राज्य कोणते आहेत? ते अनुक्रमे किती उत्पादन घेतात? या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? याबाबतची सविस्तर माहिती (Green Chilli Farming) आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

पहिली पाच राज्य कोणती? (Green Chilli Farming Top States In India)

राष्ट्रीय फळबाग महामंडळाच्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वाधिक हिरव्या मिरचीचे उत्पादन (Green Chilli Farming) हे दक्षिणेकडील राज्य असलेल्या कर्नाटक राज्यात घेतले जाते. कर्नाटक हे हिरव्या मिरचीच्या उत्पादनातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असून, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिरवी मिरचीची लागवड होते. देशातील एकूण हिरव्या मिरचीच्या उत्पादनापैकी कर्नाटकात 23.86 टक्के इतके उत्पादन घेतले जाते. मध्यप्रदेश हे राज्य हिरव्या मिरचीच्या उत्पादनाबाबत दुसऱ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी 17.22 टक्के हिरव्या मिरचीचे उत्पादन होते. तिसऱ्या क्रमांकावर आंध्रप्रदेश असून, त्या ठिकाणी 12.01 टक्के उत्पादन होते. याशिवाय 11.04 टक्के उत्पादनासह बिहार चौथ्या तर 8.37 टक्के उत्पादनासह महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.

‘या’ आहेत प्रमुख प्रजाती

खरीप हंगामात हिरव्या मिरचीची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी हंगामातील हिरव्या मिरचीची लागवड जानेवारी-फेब्रूवारी महिन्‍यात केली जाते. पुसा ज्‍वाला, पंत सी – १, संकेश्‍वरी 32, जी – 2, जी – 3, जी – 4, जी – 5, मुसाळवाडी, पुसा सदाबहार या हिरव्या मिरचीच्या प्रमुख प्रजाती आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडी योग्‍य आहेत.

रोजच्या आहारात वापरली जात असल्याने बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय हिरव्या मिरचीला परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्ट्रात हिरव्या मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टर क्षेत्रावर केली जाते. नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्‍हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्‍मानाबाद हे हिरव्या मिरचीचे प्रमुख उत्पादक जिल्हे आहेत.

error: Content is protected !!