Green Chilli Market Rate : हिरव्या मिरचीला 9000 रुपये क्विंटलचा भाव; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतीमध्ये भाजीपाला पिकांच्या (Green Chilli Market Rate) मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. मात्र, प्रत्येक भाजीपाला पिकाला दर मिळण्यासाठी एक निश्चित वेळ पकडावी लागते. सध्याच्या बाजारातील स्थितीनुसार हिरव्या मिरचीच्या बाबतीत तेच पाहायला मिळत आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये हिरव्या मिरचीची आवक मंदावल्याने, दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज हिरव्या मिरचीला बाजार समित्यांमध्ये सरासरी ४५०० ते ८५०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे आता हिरवी मिरचीच्या दर वाढीमुळे (Green Chilli Market Rate) उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आजचे हिरव्या मिरचीचे दर (Green Chilli Market Rate 26 March 2024)

संभाजीनगर बाजार समितीत (Green Chilli Market Rate) ३४ क्विंटल आवक झाली असून, कमाल 9000 ते किमान 6000 तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल, राहता बाजार समितीत 11 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9000 ते किमान 5000 तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल, कराड बाजार समितीत 39 क्विंटल आवक झाली असून, कमाल ८५०० ते किमान 7000 तर सरासरी ८५०० रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत 1491 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 7000 तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल, जळगाव बाजार समितीत 32 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8000 ते किमान 6000 तर सरासरी 7000 रुपये प्रति क्विंटल,दर मिळाला आहे.

पुणे बाजार समितीत आज ४३५ क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 4000 तर सरासरी ५७५० रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत आज ३१ क्विंटल आवक झाली असून, कमाल ६५०० ते किमान 3500 तर सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज 300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6000 ते किमान 4000 तर सरासरी ५५०० रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज 3 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान ४५०० तर सरासरी ४७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हिरव्या मिरचीची आवक प्रभावित

दिवाळीपासून आवक वाढल्याच्या परिणामी अवघ्या एक हजार ते १२०० रुपये क्‍विंटल असलेल्या हिरव्या मिरचीच्या दरात (Green Chilli Market Rate) सध्या चांगली सुधारणा झाली आहे. दिवाळीनंतर हिरव्या मिरचीला दर नसल्याने शेतकऱ्यांनी लाल मिरची (वाळलेली) विकण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक प्रभावित झाली होती. तसेच सध्या रब्बी हंगामातील हिरव्या मिरचीचे पीक संपले असून, उन्हाळी हंगामातील हिरव्या मिरचीचे पीक तोडणीला वेळ आहे. ज्यामुळे सध्या बाजारात पुरेशा प्रमाणात हिरवी मिरची नसल्याने, दरात सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!