शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत; पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही घेतली शेतकरी आंदोलनात उडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कृषी कायद्यांवरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली आहे. केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं आहे. शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे.

इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानापाठोपाठ तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असले तरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे.

नवीन कृषी कायदे रद्द करा, असं म्हणत दोन महिन्यांपूर्वी पंजाब, हरयाणासह देशातील विविध ठिकाणाहून शेतकऱ्यांना दिल्लीला धडक दिली होती. मात्र, शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं. तेव्हापासून सिंधू, टिकरी आणि गाझीपूर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसाचाराच्या आरोपानंतर शेतकरी आंदोलन आणखी पेटलं असून, आता त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटू लागले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!