चंद्र आणि मंगळावर होणार का भाज्यांची शेती? जाणून घ्या कोणती असेल पहिली भाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परग्रहावर शेती म्हटले की लोकांच्या भुवया उंचावतात. जगभरातील अनेक अंतराळ संशोधन संस्था व उद्योजक चंद्र किंवा मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी सातत्याने नवे नवे संशोधनही होत असते. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरही यासंबंधी काही प्रयोग होत असतात. आता तेथील अंतराळवीर भाज्यांच्या शेतीचा प्रयोग करून पाहणार आहेत. ‘पाक चोई’ नावाची चिनी भाजी यासाठी ग्रहांवर पाठवण्यात आली आहे.

मोहरीची भाजीही चंद्रावर उगविली जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसे पाहिले तर पाक चोई ही भाजी अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. सध्या अंतराळ स्थानकावर राहत असलेले अंतराळवीर ही भाजी गार्लिक पेस्ट लावून खाण्याचा आनंदही घेत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या आनंदात भर पडणार आहे.

सध्या अंतराळ स्थानकावर राहत असलेले अंतराळवीर ही भाजी गार्लिक पेस्ट लावून खाण्याचा आनंदही घेत आहेत. भाजी अंतराळातील या स्थानकात उगवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. भविष्यात चंद्र किंवा मंगळावर अंतराळवीर पाठवले जाण्याच्या मोहिमेवेळी या प्रयोगाचा उपयोग होईल. ‘नासा’ने अंतराळ स्थानकावरील याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे. पाक चोई आणि अमारा यांची 13 एप्रिलला तिथे लागवडही केली आहे. 64 दिवस तिच्या वाढीकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे चंद्र आणि मंगळवार आता आपल्याकडील भाज्या असतील यात शंका नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!