Guava Farming : पेरूच्या नवीन तीन प्रजाती विकसित; ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर पाण्याअभावी अनेकदा कोणते पीक (Guava Farming) घ्यावे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सध्या राज्यात कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या पेरूसह अन्य फळ झाडांची शेती करताना अनेक शेतकरी दिसतात. आता अशाच पेरू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लखनऊ येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने पेरुच्या ललित, श्वेता, धवल आणि लालिमा या प्रजाति विकसित केल्या आहेत. या प्रजातींचे फळ हे पारंपरिक पेरू जातींपेक्षा मोठे असते. तसेच चवीला गोड असल्याने या प्रजातीच्या पेरूंना (Guava Farming) बाजारात दरही चांगला मिळू शकतो.

संस्थेने विकसित केलेल्या प्रजाती (Guava Farming Three New Species)

1. ललित
ललित या प्रजातीची फळे आतून गुलाबी रंगाची आणि बाहेरून दिसायला आकर्षक असतात. फळाचा आतील गर हा कडक आणि गुलाबी रंगाचा असतो. त्यात साखर आणि आम्लाचे प्रमाण हे योग्य प्रमाणात असते. साठवणूक करून ठेवला तरी या प्रजातीचा पेरू आपला रंग आणि आकर्षकपणा कायम राखतो. पेरूची ही जात ‘अलाहाबाद सफेदा’ या लोकप्रिय पेरू जातीपेक्षा सरासरी 24 टक्के अधिक उत्पादन देते. या वैशिष्ट्यांमुळे ही जात शेतीसाठी योग्य मानली जात आहे.

2. श्वेता
पेरूची श्वेता ही जात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रभावी मानली जाते. या जातीच्या पेरूचे झाड हे मध्यम स्वरूपाचे असते. फळ गोल आकाराचे असतात. फळातील बिया या मुलायम असल्याने, ही जात ग्राहकांसाठी उत्तम ठरू शकते. या जातीच्या एका पेरूचे वजन हे सरासरी 225 ग्रॅम इतके असते. या प्रजातीच्या झाडांची चांगली काळजी घेतल्यास त्यापासून प्रति झाड 90 किलोपर्यंत पेरू उत्पादन मिळू शकते.

3. धवल
पेरूची धवल ही जात ‘अलाहाबाद सफेदा’ या जातीपेक्षा 20 टक्के जास्त उत्पादन देते. फळे गोलाकार, गुळगुळीत आणि मध्यम आकाराची असतात. या प्रजातीच्या पेरूचे सरासरी वजन 200-250 ग्रॅम इतके असते. पिकल्यावर फळाचा रंग हलका पिवळा असतो. आणि आतील गर हा पांढरा, सौम्य आणि गोड असतो. बिया खायला तुलनेने मऊ असतात.

4. लालिमा
लालिमा ही पेरूची जात ‘सफरचंद पेरू’मधून विकसित केलेली जात आहे. फळांचा रंग लाल असतो. प्रति फळ सरासरी वजन 190 ग्रॅम असते. या प्रजातीच्या पेरू लागवडीतून उत्पादनही चागंले मिळते.

हिवाळ्यातील पेरू व्यवस्थापन

हिवाळ्यात अधिक फळ येण्यासाठी पेरूचे (Guava Farming) योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. हिवाळयात मिळणारे पेरूचे फळ हे गुणवत्तापूर्ण, आणि त्यास दरही चांगला मिळतो. तुम्हालाही हिवाळयात पेरूच्या माध्यमातून अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर मार्च आणि एप्रिल महिन्यात पेरूच्या झाडांच्या फाद्यांना फुलांसहित छाटून टाका. ज्यामुळे हिवाळ्यातील बहरात येणारे पेरूचे फुल आणि फळ हे गुणवत्तापूर्ण मिळते. पेरू लागवडीसाठी जुलै-ऑगस्ट हा कालावधी उत्तम मानला जातो. सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात देखील पेरूची लागवड करू शकता.

error: Content is protected !!