Gulab Farming : 2 एकरात गुलाब फुलाची शेती; शेतकरी वर्षाला 20 लाख कमवतोय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (Gulab Farming) शेती करत आहे. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे शेतीमधील कष्ट कमी झाले असून, त्यांना अधिकचे उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या यशस्वी गुलाब फुलशेतीबाबत जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे हा शेतकरी केवळ दोन एकर शेतीतून वार्षिक 20 लाखांचा टर्नओव्हर करत आहे. इतकेच नाही तर हा शेतकरी आपल्या गुलाब फुलशेतीसाठी (Gulab Farming) पॉलीहाउस आणि आर्टिफिशियल इण्टेलिजन्स (एआय) या आधुनिक पद्धतींचा अवलंब करत आहे.

2 एकरात पॉलीहाऊस उभारणी (Gulab Farming In Polyhouse)

अमित सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील झांसी जिल्ह्यातील रहिवासी (Gulab Farming) आहे. शेतकरी अमित सिंह हे यापूर्वी स्ट्रॉबेरी लागवड करत होते. मात्र, त्यातून अन्य पिकाकडे वळण्याचा विचार करत होते. अशातच त्यांना 2018 मध्ये गुलाब फुलाच्या लागवडीबाबत कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी आपले दोन एकर शेत चांगले तयार करून घेतले. तसेच आपल्या दोन एकरात पॉलीहाऊसची उभारणी केली. याशिवाय त्यांनी आपल्या पॉलीहाऊसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करणे देखील सुरु केले.

पुण्याहून मागवली रोपे

शेतकरी अमित सिंह सांगतात, आपण गुलाब फुलाच्या लागवडीसाठी सर्व रोपे ही महाराष्ट्रातील पुणे येथून मागवली. आपण पाच प्रजातीच्या माध्यमातून 2 एकरात गुलाब शेती फुलवली आहे. यामध्ये हाइब्रिड टी, छोटा गुलाब, फ्लोरिबंडा गुलाब, अल्बा गुलाब ,क्लाइंबिंग गुलाब या प्रजातींचा समावेश आहे. गुलाबाच्या या पाचही प्रजाती अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी उत्तम मानल्या जातात.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी अमित सिंह सांगतात, मागील 5 वर्षांपासून आपण गुलाब फुलाची शेती करत आहे. आपल्या शेतीमध्ये उत्पादित फुले आपण झांसीसह लखनऊ, उदयपुर, जयपुर आणि उत्तराखंडमधील बाजारात पाठवतो. खुल्या पद्धतीने लागवड करताना कमी उत्पन्न मिळते. मात्र, पॉलीहाऊसच्या उभारणीमुळे आपल्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. २ एकरातील गुलाब शेतीतून बाजारभावातील चढ-उतारानुसार आपल्याला वार्षिक 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न सहज मिळत असलयाचे ते सांगतात.

शेतकरी अमित सिंह यांनी म्हटले आहे की, आपण पॉलीहाऊसमध्ये कीटकनाशक फवारणी आणि खते देण्यासाठी संपूर्ण पॉलीहाऊसमध्ये पाईपलाईन उभारली आहे. ज्यामुळे आपल्याला अधिकच्या मजुरांची गरज पडत नाही. काही वेळात फवारणी आणि खते देता येतात. याशिवाय आपण कंट्रोल रुम उभारली असून, पीक संरक्षणाचे उपाय करण्यात आले आहे. त्यामुळे अमित यांचे पॉलीहाऊस हे देशातील अत्याधुनिक पॉलीहाउस म्हणून ओळखले जाते.

error: Content is protected !!