Gulab Farming : गुलाब शेती करताना वापरा ‘हे’ तंत्र; मिळतील मोठ्या आकाराची फुले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात फुलशेतीकडे (Gulab Farming) वळत आहे. यामध्ये काही शेतकरी पॉलीहाऊसची उभारणी करून, मोठ्या प्रमाणात गुलाब फुलाची लागवड करत आहेत. मात्र पॉलीहाऊसच्या मदतीने गुलाब फुलाची शेताची करताना काही शेतकऱ्यांना गुलाब फुलाच्या आकारात वाढ होत नसल्याची समस्या असते. त्यामुळे आज आपण पॉलीहाऊसमध्ये गुलाब फुलाची शेती (Gulab Farming) करताना फुलांची साईज कशी वाढवली जाऊ शकते. याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

फुलांची साईज वाढवण्याचे तंत्र? (Gulab Farming Use This Technique)

गेल्या काही वर्षात गुलाबाच्या फुलांच्या (Gulab Farming) मागणीत मोठी झाली आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांमुळे फुलांची नेहमीच मागणी असते. इतकेच नाही तर गुलाब फुलापासून गुलाब जल, अत्तर, गुलकंद आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती मिळवल्या जातात. त्यामुळे आता तुम्ही गुलाब फुलाची शेती करण्याची करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याबाबत अधिक माहिती असणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण बल्बच्या प्रकाशाच्या मदतीने गुलाबाच्या फुलाचा आकार कसा वाढवता येतो. हे आज आपण समजून घेणार आहोत. साधारणपणे बल्बच्या मदतीने गुलाब फुलाचा आकार वाढवण्याचे तंत्र हे पॉलीहाऊस पद्धतीत वापरले जाते.

बल्बचा वापर ठरतो प्रभावी

गुलाब शेती करताना झाडांना प्रकाशाची मोठ्या प्रमाणात आवश्कयता असते. प्रकाशाच्या मदतीने गुलाब फुलांच्या कळ्यांचा विकास वेगाने होतो. तज्ज्ञांच्या मते पॉलीहाऊसमध्ये गुलाब शेती करताना जास्त प्रकाश आणि तापमान कमी ठेवल्यास झाडांना अधिक फुटवे फुटतात. यासाठी शेतकऱ्यांनी बल्बचा वापर केल्यास शेतकऱ्यांना अधिक आकाराचे फुल मिळण्यास मदत होते. दरम्यान, पॉलीहाऊसमध्ये शेडनेटमुळे तापमान कमी होऊन जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी हा उपाय करणे अगत्याचे ठरते.

फुले तोडणीची पद्धत

गुलाब फुलांची तोडणी प्रामुख्याने कळीच्या अवस्थेत तोंडाने आवश्यक असते. ज्यावेळी कळीच्या एक किंवा दोन पाकळ्या खुलणे बाकी असते. त्यावेळी फुलांची तोडणी आवश्यक करणे असते. विशेष म्हणजे गुलाबाची तोडणी करताना कळी खूप मोठी होऊ देऊ नये, लहान अवस्थेत तोडलेली कळी पूर्ण क्षमतेने खुलण्यास मदत होते. याशिवाय फुलाची तोडणी करताना लांब दांडे ठेवून, तिरका काप द्यावा. तोडणीनंतर गुलाबाचे फुल पाण्यात बुडून ठेवावेत. ज्यामुळे विक्रीला नेताना ते अधिक काळ ताजेतवाने राहण्यास मदत होते.

error: Content is protected !!