Halad Bajar Bhav : हळद दरात 1400 रुपयांनी वाढ; सोयाबीनची घसरण कायम; पहा आजचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा भावाने (Halad Bajar Bhav) चांगलीच साथ दिली आहे. हळदीची प्रमुख बाजार समिती असलेल्या हिंगोली आणि बसमत या दोन बाजार समित्यांमध्ये आज हळदीच्या दरात प्रति क्विंटलमागे 1400 रुपये इतकी वाढ नोंदवली गेली आहे. याउलट राज्यातील सोयाबीन दर मात्र चांगलेच घसरणीला लागले असून, राज्यात सध्या सोयाबीनला सरासरी 4100 ते 4400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. अर्थात 4600 रुपये या केंद्र सरकारच्या हमीभावापेक्षा हा दर जवळपास 300 ते 500 रुपये प्रति क्विंटलने कमी आहे. ज्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला (Halad Bajar Bhav) आले आहे.

आजचे हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav In Maharashtra)

हिंगोली बाजार समितीत (Halad Bajar Bhav) आज हळदीची 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15000 ते किमान 12900 रुपये तर सरासरी 13950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील बसमत बाजार समितीत आज हळदीची 1177 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15390 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 11195 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मुंबई बाजार समितीत आज हळदीची 184 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 15000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नांदेड बाजार समितीत आज हळदीची 728 क्विंटल आवक झाली असून, कमाल 14795 ते किमान 11300 रुपये तर सरासरी 13105 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

याउलट मागील पंधरा दिवसांपासून सोयाबीनचे दर हे एका पातळीवर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला राज्यातील लातूर, देवणी आणि उमरखेड या तीन बाजार समित्या वगळता अन्य कुठेही सोयाबीनला हमीभावाइतका दर मिळत नाहीये. लातूर बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4700 ते किमान 4285 रुपये तर सरासरी 4600 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4650 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4630 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील देवणी बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4612 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4556 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर अन्य सर्व बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षा सरासरी 300 ते 500 रुपये प्रति क्विंटलने कमी असल्याचे पाहायला मिळाले.

error: Content is protected !!