Halad Bajar Bhav : हळद दरात 1350 रुपयांनी वाढ; पहा आजचे हळद बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले दोन-तीन वर्ष हळद (Halad Bajar Bhav) पिकाने राज्यातील शेतकऱ्यांना खूप रडवले होते. जवळपास 5 ते 6 हजारांपर्यंत घसरलेले दर पाहता, शेतकरी बाजार समित्यांमध्ये आक्रमक पवित्रा घेत होते. तसेच आपल्या पिवळ्या सोन्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हळद उकिरड्यावर टाकून द्यावी का? असा सवाल उपस्थित करत होते. मात्र, यंदा हळद पिकासाठी सर्वच गोष्टी वेळेत जुळून आल्या असून, सध्या हळदीला चांगला दर (Halad Bajar Bhav) मिळत आहे.

किती मिळाला आज दर? (Halad Bajar Bhav Today 11 March 2024)

आज राज्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या हिंगोली बाजार समितीत हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) प्रति क्विंटलमागे 1350 रुपये इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हिंगोली बाजार समितीत आज हळदीची 1300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 18350 रुपये ते किमान 15100 रुपये तर सरासरी 16725 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. ज्यामुळे आज हिंगोली बाजार समितीत आसपासच्या जिल्ह्यांमधून हळद विक्रीसाठी आलेले शेतकरी समाधान व्यक्त करत होते.

हळद लागवडीकडे पाठ

मागील दोन ते तीन वर्षांपासून हळदीला पाच हजार रुपये इतका कमी भाव मिळत होता. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांमध्ये हळद लागवडीकडे पाठ फिरवली होती. जवळपास मागील वर्षी या दिवसांमध्ये देखील हळदीला चांगला दर मिळत नव्हता. मात्र, गेल्या वर्षी 2023 मध्ये ऐन पावसाळयात भाववाढ झाली. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला हळूहळू हळद दरात वाढ होऊन, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील हळद दर 30 हजारांच्या पार गेले होते.

भाववाढीचा फायदा झाला नसल्याची खंत

हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला. त्यामुळे चालू वर्षी अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे कल वळवला. मात्र, यंदाच्या वर्षात झालेला कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन घटीचा सामना करावा लागला. ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांना हळद दरात वाढ होऊनही त्याचा फायदा मिळताना दिसत नाही. खर्च अफाट मात्र त्या तुलनेत उत्पादन कमी मिळाल्याने, भाववाढीचा फायदा झाला नसल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहे.

error: Content is protected !!