Halad Bajar Bhav : हळद दरात सुधारणा कायम; वाचा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) मोठी वाढ झाली आहे. हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात देखील हळदीचा दर प्रतिक्विंटल 21369 रुपयांवर पोहोचला आहे. तर ,महाराष्ट्रात सध्या हळद दर सरासरी 12500 ते 17500 प्रति क्विंटलपर्यंत असल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यामध्ये हळद दरात आणखी वाढ होण्याची शक्यता हळद व्यापारातील जाणकार व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच महिन्यात शेतकऱ्यांना हळदीला सध्याच्या दरापेक्षा निम्मा दर देखील मिळत नव्हता. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रफुल्लित वातावरण असून, सध्याच्या मिळणाऱ्या हळद दराबाबत (Halad Bajar Bhav) ते समाधान व्यक्त करत आहेत.

आजचे हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 15 March 2024)

राज्यातील प्रमुख बाजार समितीत असलेल्या (Halad Bajar Bhav) हिंगोली बाजार समितीत आज 2850 क्विंटल आवक झाली असून, कमाल 17600 ते किमान 15500 रुपये तर सरासरी 16550 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज 300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15800 ते किमान 10100 रुपये तर सरासरी 12500 रुपये प्रति क्विंटल, बसमत (हिंगोली) बाजार समितीत आज 573 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 10600 रुपये तर सरासरी 15300 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज 189 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 15000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

जिंतूर (परभणी) बाजार समितीत आज 21 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15200 ते किमान 14500 रुपये तर सरासरी 14500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सांगली बाजार समितीत आज 19843 क्विंटल आवक झाली असून, कमाल 35000 ते किमान 15000 रुपये तर सरासरी 25000 रुपये प्रति क्विंटल, रिसोड (वाशीम) बाजार समितीत आज 1500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 17850 ते किमान 14800 रुपये तर सरासरी 16325 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दरातील तेजी कायम राहणार

चालू वर्षी जानेवारी महिन्यात हळद हंगाम सुरु झाल्यानंतर साधारणपणे हळदीला सरासरी 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. अर्थात यावर्षी जानेवारी महिन्यानंतर बाजारातील आवक हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या दोन महिन्यात ऐन काढणी हंगामात वाढलेल्या आवकचा हळद दरांवर (Halad Bajar Bhav) कोणताही परिणाम झाला नाही. बाजारात येत असलेल्या मालापेक्षा मागणी अधिक राहिल्याने दर तेजीतच कायम राहिले. अशातच आता देशातील हळद बाजारात आगामी काळात देखील तेजी कायम राहणार असल्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!