Halad Bajar Bhav : सांगलीत राजापुरी हळदीला 31,000 रुपये भाव; पहा आजचे भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी कमी पावसाचा सर्वच पिकांना फटका (Halad Bajar Bhav) बसला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला एक महिना झालेला कमी पाऊस, त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेला पावसाचा खंड आणि नोव्हेंबरच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस याचा यंदा हळद पिकालाही फटका बसला. मात्र नावातच दम असलेल्या राजापुरी हळदीचा राजेशाही थाट यावर्षीही पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या नवीन राजापुरी हळदीला (Halad Bajar Bhav) पहिल्याच दिवशी आज सांगली बाजार समितीत हंगामातील उच्चांकी 31,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.

आजचे हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 2 Feb 2024)

हंगामातील पहिल्याच दिवशी आज सांगली बाजार समितीत राजापुरी हळदीची एकूण 158 क्विंटल आवक झाली असून, कमाल 31000 ते किमान 10500 तर सरासरी 20750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय प्रमुख बाजार समिती असलेल्या हिंगोली बाजार समितीतही हळदीचे दर स्थिर आहेत. हिंगोली बाजार समितीत आज हळदीची 1300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 13800 ते किमान 11500 तर सरासरी 12650 रुपये प्रति क्विंटल दर, वाशीम बाजार समितीत आज हळदीची 150 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12650 ते किमान 9500 तर सरासरी 10500 रुपये प्रति क्विंटल दर, वसमत बाजार समितीत आज हळदीची 699 आवक झाली असून, कमाल 15025 ते किमान 9500 तर सरासरी 12262 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

सांगली आणि हिंगोली हे दोन हळदीच्या (Halad Bajar Bhav) उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध जिल्हे आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हळदीची मुख्य बाजारपेठ आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात राजापुरी हळदीचे सर्वाधिक उत्पादन होते. आज सांगली बाजार समितीत यावर्षीच्या नवीन हंगामातील राजापुरी हळद दाखल झाली. हंगामाच्या पहिल्याच्या दिवशी राजापुरी हळदीने कमाल 31000 रुपये प्रति क्विंटल उच्चांकी दर नोंदवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा आनंद दिसून येत आहे.

राजापुरी हळदीचा दर्जा हा इतर जातींच्या तुलनेत अधिक असतो. याशिवाय राजापूरी हळद ओळखायची पद्धतही सोपी आहे. सुकी आणि उत्तम प्रक्रिया केलेली हळद ही सांगलीच्या पट्टयात मिळते. या भागातील शेतकऱ्यांसाठी सांगलीचे मार्केट हे राजापुरी हळदीची एकमेव मोठी बाजारपेठ आहे. राजापुरी हळदीला बाजारपेठेत मागणी देखील अधिक असते. इतकेच नाही तर शेतकऱ्यांमध्ये देखील राजापुरी हळद लागवडीबाबत क्रेझ असल्याचे पाहायला मिळते.

error: Content is protected !!