Halad Bajar Bhav : हळदीच्या दरात चढ की उतार? पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हळद दर (Halad Bajar Bhav) स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील हळदीची प्रमुख बाजार समिती असलेल्या हिंगोली बाजार समितीत आज 2200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 11680 ते किमान 9880 तर सरासरी 10780 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. वसमत बाजार समितीत आज 1729 क्विंटल आवक झाली असून, कमाल 14276 ते किमान 9705 तर सरासरी 11990 रुपये प्रति क्विंटल दर (Halad Bajar Bhav) मिळाला आहे.

मागील वर्षीच्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये हिंगोली बाजार समितीत हळदीला सरासरी 14 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर ( (Halad Bajar Bhav) मिळत होता. त्यानंतर ऑक्टोबरपासून भावात जवळपास क्विंटलमागे दोन ते तीन हजारांनी घसरण झाली आहे. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून हळद दर 11 ते 12 हजारांच्या आसपास स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

आजचे हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 20 Jan 2024)

मुंबई बाजार समितीत आज 45 क्विंटल आवक झाली असून, कमाल 21000 ते किमान 14000 तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल, सांगली बाजार समितीत आज 486 क्विंटल आवक झाली असून, कमाल 11800 ते किमान 6500 तर सरासरी 9150 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज 300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9000 ते किमान 8000 तर सरासरी 8500 रुपये प्रति क्विंटल, वाशीम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत आज 1250 क्विंटल आवक झाली असून, कमाल 11500 ते किमान 10300 तर सरासरी 11000 रुपये प्रति क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर बाजार समितीत आज 15 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12000 ते किमान 10000 तर सरासरी 11000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अशाच पद्धतीने रोजचे हळदीचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.

दर तेजीत राहण्याची शक्यता

मकर संक्रातीपासून बाजारात हळूहळू हळदीची आवक सुरु झाली असून, फेब्रुवारी महिन्यात बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक वाढू शकते. यावर्षी हळद पिकाला कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला आहे. काही भागांमध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे उत्पादनात घटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यामध्ये बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्यानंतर हळद दरावर काहीसा दबाव दिसून येईल. मात्र एकूणच उत्पादन घटीमुळे यावर्षीच्या हंगामात हळद दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!