Halad Bajar Bhav : हळद दर उच्चांकी पातळीवर; वाचा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद (Halad Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुरु असलेली हळद दरातील वाढ सुरूच आहे. आज राजापुरी हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली बाजार समितीत, हळदीला उच्चांकी 61000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. राज्यातील हळद काढणी हंगाम शेवटा आला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हळद दराने (Halad Bajar Bhav) उसळी घेतल्याने, शेतकरी काहीसा सुखावला आहे.

आजचे हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 20 March 2024)

सांगली बाजार समितीत आज 17980 क्विंटल आवक झाली असून, कमाल 61000 ते किमान 15900 रुपये तर सरासरी 38450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मुंबई बाजार समितीत आज 462 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 15000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज 1900 क्विंटल आवक झाली असून, कमाल 19000 ते किमान 16000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

नांदेड बाजार समितीत आज 572 क्विंटल आवक झाली असून, कमाल 17300 ते किमान 14000 रुपये तर सरासरी 15690 रुपये प्रति क्विंटल, बसमत (हिंगोली) बाजार समितीत आज 847 क्विंटल आवक झाली असून, कमाल 17505 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 12752 रुपये प्रति क्विंटल, जिंतूर बाजार समितीत आज 8 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15025 ते किमान 15025 रुपये तर सरासरी 15025 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकरी द्विधा मनःस्थितीत

राज्यातील हळद उत्पादक जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतात हळद काढणी अंतिम टप्प्यात आहे. ज्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये हळद दरवाढ झाली. तर आपल्याला फायदा मिळावा. यासाठी शेतकरी हळद मागे ठेवावी? की लागोलाग बाजारात सध्याच्या घडीला आहे त्या दरांमध्ये विक्री करून टाकावी? अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हळद दरात चढ-उतार सुरूच आहे. परिणामी, सध्या तरी दरवाढीबाबत स्पष्टता होणे अवघड आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी दैनंदिन बाजार भावावर लक्ष ठेवावे. तसेच भविष्यातील दरवाढीचा अंदाज घेत आपल्याकडील हळद टप्प्याटप्प्याने विक्री करावी. असे हळद बाजारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!