Halad Bajar Bhav : हळद दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जानेवारी महिन्याच्या शेवटी हळद दरात (Halad Bajar Bhav) वाढ होण्यास हळूहळू सुरुवात झाली. त्यानुसार मागील पंधरा दिवस ते तीन आठवड्यांपासून हळदीचे बाजारभाव एका स्थिर पातळीवर टिकून असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षीचा हळद हंगाम सुरु होऊन, जवळपास एक महिन्याहून अधिक काळ उलटला असून, सांगली आणि हिंगोली या दोनही प्रमुख हळद बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचे आवक होत आहे. मात्र असे असतानाही अधिकच्या आवकचा कोणताही परिणाम दरावर झालेला नसून, हळद बाजारात झालेली दरवाढ (Halad Bajar Bhav) कायम आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 21 February 2024)

हिंगोली बाजार समितीत हळदीची 1500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 14520 ते किमान 11990 रुपये तर सरासरी 13255 रुपये प्रति क्विंटल दर (Halad Bajar Bhav) मिळाला आहे. मुंबई बाजार समितीत हळदीची 298 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 15000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील बसमत बाजार समितीत हळदीची 1126 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15000 ते किमान 8505 रुपये तर सरासरी 11752 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. नांदेड बाजार समितीत हळदीची 568 क्विंटल आवक झाली असून, कमाल 14495 ते किमान 10495 रुपये तर सरासरी 12505 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर राजापुरी हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली बाजार समितीत आज राजापुरी हळदीची 2084 क्विंटल आवक झाली असून, कमाल 25800 ते किमान 12000 रुपये तर सरासरी 18900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हळद दर तेजीतच राहणार

दरम्यान, हंगामाच्या महिनाभरानंतर सध्या बाजार मोठ्या प्रमाणात आवक होत असून, केवळ राज्यातूनच नाही तर शेजारील कर्नाटक राज्याच्या काही भागांमधूनही हळदीची वाहने राज्यात दाखल होत आहेत. मात्र आवक वाढलेली असली तरी बाजारात हळदीला मागणी देखील आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये दोन्ही सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात लिलाव होत आहेत. सध्या बाजारात उच्च गुणवत्तेची हळद येत असून, परिणामी व्यापाऱ्यांमध्ये देखील खरेदी करण्यास स्पर्धा निर्माण होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना देखील चांगला दर मिळण्यास फायदा होत असल्याचे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे. तर सध्याची एकूणच परिस्थिती पाहता, आगामी काळात देखील हळद दर तेजीतच राहणार असल्याचे हळद बाजारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!