Halad Bajar Bhav : हळद दरात घसरण; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या हळद (Halad Bajar Bhav) काढणीला चांगलाच वेग आला असून, नांदेड बाजार समितीतही या हंगामातील नवीन हळद दाखल झाली आहे. त्यामुळे आता रिसोड (वाशीम), हिंगोली, बसमत, सांगली या हळदीच्या सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये चांगली आवक पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील हळद दरात काहीसा चढ-उतार सुरूच आहे. मात्र सध्या वरील सर्वच बाजारपेठांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल 13 ते 15 हजार रुपयांपर्यंत दर कायम आहे. मागील दोन-तीन हंगामांपासून हळदीला चांगला दर (Halad Bajar Bhav) मिळू लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कुठे झाली घसरण (Halad Bajar Bhav In Maharashtra)

हिंगोली बाजार समितीत आज 1005 क्विंटल आवक झाली असून, कमाल 13600 ते किमान 12100 रुपये तर सरासरी 12850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हिंगोली बाजार समितीत आज गुरुवारच्या तुलनेत 800 ते 850 रुपयांनी घसरण नोंदवली गेली आहे. बसमत (हिंगोली) बाजार समितीत आज 1065 क्विंटल आवक झाली असून, कमाल 14000 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 11600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. बसमत बाजार समितीत आज गुरुवारच्या तुलनेत 100 रुपयांनी घसरण नोंदवली गेली आहे.

नांदेड मार्केटमध्ये नवीन हळद

दरम्यान, नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक सुरु झाली असून, आज 469 क्विंटल आवक झाली आहे. तर त्या ठिकाणी हळदीला कमाल 15377 ते किमान 9000 रुपये तर सरासरी 12300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. रिसोड (वाशीम) बाजार समितीत आज 670 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12400 ते किमान 10250 रुपये तर सरासरी 11375 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मुंबई बाजार समितीत आज 107 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 15000 रुपये तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उत्पादन घटले, खर्च वाढला

दोन ते तीन हंगामापूर्वी राज्यातील हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) कमालीची घसरण होऊन, ते पाच ते सात हजारांपर्यंत खाली आले होते. मात्र सध्या हळद उत्पादकांना चांगला दर मिळत असल्याने, त्यांची आर्थिक घडी पूर्वपदावर आली आहे. मात्र असे असले तरी यंदा हळद उत्पादकांना कमी पाऊस, करपा रोगाचा प्रादुर्भाव, हुमणीचा प्रादुर्भाव सोसावा लागला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची एकरी हळद उत्पादकता घटली आहे. अशातच हळद काढणीला मजुरी देखील भरमसाठ जात असलयाचे शेतकरी सांगत आहे. ज्यामुळे यंदा चांगला दर मिळत असला तरी खर्चाचे प्रमाण देखील वाढले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!