हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक (Halad Bajar Bhav) शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. राज्यासह देशामध्ये हळद खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समितीत आज हळदीच्या दरात प्रति क्विंटलमागे 2,261 रुपये इतकी मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (ता.19) हिंगोली बाजार समितीत हळदीला कमाल 11680 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला चार दिवस आलेल्या लागोपाठ सुट्ट्यांनंतर, हिंगोली बाजार समितीत आज हळदीला कमाल 13941 रुपये प्रति क्विंटल इतका दर (Halad Bajar Bhav) मिळाला आहे. त्यामुळे आज हळद विक्रीला आलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
आजचे हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 24 Jan 2024)
हिंगोली बाजार समितीत आज 2200 क्विंटल हळदीची (Halad Bajar Bhav) आवक झाली असून, कमाल 13941 ते किमान 11500 तर सरासरी 12720 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत बाजार समितीतही आज मागील आठवड्याच्या तुलनेत प्रति क्विंटलमागे कमाल 700 ते 800 रुपये वाढ झाली आहे. वसमत येथे आज 481 क्विंटल हळदीची आवक झाली असून, कमाल 15010 ते किमान 9200 तर सरासरी 12105 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय मुंबई येथील बाजार समितीत आज 158 क्विंटल हळदीची आवक झाली असून, कमाल 21000 ते किमान 14000 तर सरासरी 17500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
अशाच पद्धतीने रोजचे हळदीचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.
शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
मकर संक्रातीपासून हिंगोली बाजार समितीत हळूहळू हळदीची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, पुढील महिन्यात बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या दरात झालेली ही वाढ टिकून राहणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, हिंगोली बाजार समिती हळदीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या बाजार समितीमध्ये जिल्हाभरासह विदर्भातील हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपली हळद विक्रीसाठी घेऊन येतात. विशेष म्हणजे या बाजार समितीमध्ये हळदीला दरही चांगला मिळतो. असा हळद उत्पादकांचा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे आज बाजार समितीमध्ये हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून दराबाबत समाधान व्यक्त केले जात होते.