Halad Bajar Bhav : हळदीच्या दरात 15 टक्क्यांनी घसरण; शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील पंधरवड्यात हळदीचे दर (Halad Bajar Bhav) काहीसे चढे असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात हळदीचे दर 15 टक्क्यांनी घसरले आहेत. आज राज्यातील बाजार समितीत हळदीचे दर सरासरी 12000 ते 15000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी हळदीचे दर 18000 हजारांपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले होते. मात्र सध्या हळदीच्या दरात (Halad Bajar Bhav) झालेल्या घसरणीमुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 5 April 2024)

नांदेड बाजार समितीत आज हळदीची (Halad Bajar Bhav) 2227 क्विंटल आवक झाली असून, कमाल 17100 ते किमान 10600 रुपये तर सरासरी 15000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. बसमत बाजार समितीत आज हळदीची 862 क्विंटल आवक झाली असून, कमाल 19500 ते किमान 14500 रुपये तर सरासरी 15700 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज हळदीची 3000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15925 ते किमान 11000 रुपये तर सरासरी 12700 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज हळदीची 322 क्विंटल आवक झाली असून, कमाल 22000 ते किमान 16000 रुपये तर सरासरी 19000 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज हळदीची 3000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 16550 ते किमान 14500 रुपये तर सरासरी 15525 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दक्षिणेकडील राज्यात आवक वाढली

हळद व्यापारातील जाणकारांच्या माहितीनुसार, मागील आठवडाभरात तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये नियमित आवकपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आवक वाढली आहे. ज्यामुळे हळद बाजारातील वाढीनंतर, देशभरातील बाजार समित्यांमध्ये हळद दर (Halad Bajar Bhav) पुन्हा 10 ते 15 टक्क्यांनी घसरले आहेत. ज्यामुळे सध्या शेजारील राज्यांमधील हळद बाजारातील प्रभाव महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये देखील पाहायला मिळत असून, हळद दरात घसरण नोंदवली गेली आहे.

कधी होणार पुन्हा दरवाढ?

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, “यंदा देशातील एकूण हळद उत्पादनात काहीशी घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मागील वर्षभरात हळद दरात (Halad Bajar Bhav) 10.49 टक्के वाढ दिसून आली होती. ज्यात 2024 या वर्षभरात आणखी 5.83 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील बाजार समित्यांमध्ये आवक वाढून, त्याचा दरावर परिणाम झाला आहे. मात्र, हा परिणाम अल्प काळासाठी राहणार असून, एकदा संबंधित राज्यांमध्ये आवक घटल्यानंतर पुन्हा हळदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.”

error: Content is protected !!