Halad Bajar Bhav : सांगली मार्केटमध्ये हळदीला विक्रमी 41 हजारांचा भाव; मागणीतही मोठी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात राजापुरी हळदीसाठी (Halad Bajar Bhav) सुप्रसिद्ध असलेल्या सांगली बाजार समितीत, सध्या हळदीचे दर चांगलेच तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सांगली मार्केटमध्ये कर्नाटकातील एका शेतकऱ्याने आणलेल्या हळदीला आजपर्यंतचा राज्यातील विक्रमी 41,101 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तर राज्यातील इतर उत्पादक बाजार समितीमध्ये सध्या हळदीला सरासरी 12000 ते 23350 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंगोलीसह आसपासच्या बाजार समित्यांमध्ये देखील सध्या दरात (Halad Bajar Bhav) तेजीचे वातावरण कायम आहे. ज्यामुळे हळद उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आजचे हळद बाजारभाव (Halad Bajar Bhav Today 6 March 2024)

सांगली बाजार समितीत (Halad Bajar Bhav) 12960 क्विंटल आवक झाली असून, कमाल 27000 ते किमान 13500 रुपये तर 20250 सरासरी रुपये दर प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मुंबई बाजार समितीत 366 क्विंटल आवक झाली असून, कमाल 20000 ते किमान 15000 रुपये तर 17500 सरासरी रुपये दर प्रति क्विंटल, नांदेड बाजार समितीत 608 क्विंटल आवक झाली असून, कमाल 15501 ते किमान 9495 रुपये तर 13700 सरासरी रुपये दर प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत 900 क्विंटल आवक झाली असून, कमाल 16000 ते किमान 13500 रुपये तर 14750 सरासरी रुपये दर प्रति क्विंटल, सेनगाव बाजार समितीत 9 क्विंटल आवक झाली असून, कमाल 13000 ते किमान 10000 रुपये तर 12000 सरासरी रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

देशभरातून मागणीत मोठी वाढ

राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सध्या काही प्रमाणात हळदीची आवक घटली आहे. असे असतानाच सांगली बाजार समितीत मात्र सध्या महाराष्ट्रासह कर्नाटकातील लगतच्या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात हळदीची वाहने दाखल होत आहे. अशातच उन्हाळा सुरु झाल्याने देशभरातील गृहिणींचा सध्या मसाला तयार करण्याचा हंगाम सुरु झाला आहे. ज्यामुळे बाजारात हळदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गुजरातसह उत्तर भारतीय राज्यांमधून हळदीला मागणी वाढली आहे. ज्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून हळद दरात हळूहळू चढता आलेख पाहायला मिळत असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!