Halad Processing : 10 एकरात सेंद्रिय हळद लागवड; प्रक्रिया करून कमावले 30 लाख रुपये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हळद लागवडीखालील (Halad Processing) क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, हिंगोली आणि सांगली बाजारपेठ हळदीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे चालू वर्षी हळदीला चांगला बाजारभाव देखील मिळाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाच्या माध्यमातून यंदा आर्थिक समृद्धी मिळाली आहे. आज आपण अशाच एका हळद उत्पादन घेतलेलया, यशस्वी महिला व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या 10 एकर जमिनीतून हळदीचे 100 क्विंटल उत्पादन मिळवले आहे. इतकेच नाही त्यांनी आपल्या या हळदीवर स्वतःच प्रक्रिया करून, 30 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

सेंद्रिय पद्धतीचा अवलंब (Halad Processing Woman Farmer Success Story)

कंचन वर्मा असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या मध्यप्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. कंचन वर्मा यांनी आपल्या मुरमाडी मातीची गुणवत्ता जवळपास 10 एकर जमिनीत यावर्षी हळद लागवड (Halad Processing) केली होती. यासाठी त्यांनी पूर्णपणे जैविक पद्धतीचा अवलंब केला. मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच हळद पिकावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांनी शेतखत आणि गोमूत्र फवारणीचा मार्ग अवलंबला. ज्यामुळे त्यांना सेंद्रिय पद्धतीने अधिक उत्पादन मिळवण्यास मदत झाली.

8 महिन्यात 100 क्विंटल उत्पादन?

हळद पिकाला लागणारा कालावधी पाहता, महिला शेतकरी कंचन वर्मा यावर्षी आपल्या 10 एकर जमिनीत सेंद्रिय पद्धतीने 100 क्विंटल हळद उत्पादन मिळाले आहे. त्यांनी आपल्या उत्पादित हळकुंडापासून हळद पावडर (Halad Processing) बनवण्यासाठी त्यांनी छोटेखानी प्रोजेक्ट उभारला आहे. ज्यात त्यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित 100 क्विंटल हळदीला टप्प्याटप्प्याने पाण्याने चांगले स्वच्छ करून घेतले. त्यानंतर त्यास उकळून घेतले, त्यानंतर त्यांनी उकळलेली हळद सुखवून काढली. त्यानंतर त्यांनी आपली सर्व हळद पावडर स्वरूपात विक्रीसाठी ठेवली. सेंद्रिय असल्याने त्यांच्या हळदीला यंदा चांगली मागणी होती. याशिवाय थेट प्रक्रिया केल्याने, त्यांना अधिकचे उत्पन्न देखील मिळाले.

किती मिळाले उत्पन्न?

महिला शेतकरी कंचन वर्मा या आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनल्या आहे. त्यांच्या हळद लागवडीची तसेच त्यावर प्रक्रिया करण्याची उमेद पाहून परिसरातील बरेच शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहे. कंचन वर्मा याआधी गहू या पारंपारीक पिकाची शेती करत होत्या. मात्र, त्या पारंपारिक पिकाला फाटा देत त्यांनी आता हळद लागवडीचा मार्ग निवडला आहे. विशेष म्हणजे उत्पादित हळदीवर प्रक्रिया करून, त्यांनी आपल्या 10 एकारातील 100 क्विंटल हळदीवर प्रक्रिया करून त्याद्वारे त्यांनी 30 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

error: Content is protected !!