तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेलं पीक पाण्यात; आम्हाला मदत द्या म्हणत शेतकऱ्यांचं शेतातच अर्धनग्न आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ आणले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता सरकारचे डोळे उघडण्यासाठी परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी चक्क पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतातच अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी सोयाबीनचे पूर्ण शेत जलमय झालं आहे. या कृषी प्रधान देसात शेतकरी राजा आहे, असं सांगितलं जातं की शेतकरी राजा आहे. मात्र, त्याला नावाला राजा ठेवलं आहे. पण त्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेनं हिरावला आहे. त्यामुळं आम्ही आज अर्धनग्न अवस्थेत शासनाचा निषेध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

आमचं मोठं नुकसान झालं ,मदत करा

सोयाबीन तळहाताच्या फोडाप्रमाणं जपून काढणीला आले असताना मुसळधार पाऊस झाला अन सोयाबीन, कापसात गुडघ्याइतके पाणी साचल्यानं दोन्ही नगदी पीक हातून गेले आहे. पीक विमा कंपनीच्या छाताडावर बसा आणि मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आमची शासनानं तत्काळ दखल घ्यावी. आमच्या गावात पावसाचा अतिरेक झाला आहे. आमचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं आम्हाला मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी हीच परिस्थिती विशद केली आहे. मिरखेल येथील पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

 

 

error: Content is protected !!