Hapus Mango : शेतकऱ्यांचा हापूस थेट देश-विदेशात; पोस्ट विभागाची नाविन्यपूर्ण संकल्पना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हापूस आंब्यांचा (Hapus Mango) सिझन सध्या जोरात सुरू आहे. ग्राहकांकडून बाजारात देखील हापूसला मोठी मागणी आहे. अशातच आता ग्राहकांसाठी देशासह विदेशात हापूस आंबे घरपोच करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने ‘फार्म टू फोर्क’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना सुरु केली आहे. ज्यामुळे आता भारतीय पोस्ट विभागामार्फत कोकणातील शेतकऱ्यांच्या बागांमधून थेट देश- विदेशातील आंबा प्रेमींना (Hapus Mango) दर्जेदार हापूस घरपोच पोहोचवण्यात येणार आहे.

‘आपका दोस्त इंडिया’ टॅगलाईन (Hapus Mango Indian Post)

भारतीय पोस्ट विभागाकडून यासाठी ‘आपका दोस्त इंडिया’ (Hapus Mango) ही टॅगलाईन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे डाक विभागाच्या या सेवेचे दर इतर खासगी कुरिअर सेवांपेक्षा कमी असून, ग्राहकांना कमी दरात आंबे घरोघरी पोहोचवण्यात येणार आहे. नवी मुंबई डाक विभागाने म्हटले आहे की, फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी डाक विभागाने ही एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आतापर्यंत 380 पेट्यांची घरपोच डिलिव्हरी

इतकेच नाही तर नवी मुंबई डाक विभागाने यासाठी एका खासगी कंपनीसोबत करार (Hapus Mango) केला असून, त्याद्वारे शेतातील ताजे व दर्जेदार हापूस आंबे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहेत. भारतीय देशांतर्गत बाजारपेठेव्यतिरिक्त जपान, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर आणि युरोप या देशांमधे सुद्धा कंपनी आपल्या फळांची निर्यात पोष्टाकडून केली जाणार आहे. पोष्टाच्या ‘रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क’च्या माध्यमातून आतापर्यंत 1200 किलो वजनाच्या 380 आंब्यांच्या पेट्यांची घरपोच डिलिव्हरी करण्यात आली आहे.

‘या’ कंपनीसोबत सामंजस्य करार

बेरिडेल फुड्स प्रा. लि. ही जपानला आंबे निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक निर्यातदार कंपनी आहे. भारतीय डाक विभाग आणि प्रसिद्ध आंबा निर्यातदार मे. बेरिडेल फुड्स प्रा. लि. यांच्यातील सामंजस्य करार हा आंबा पुरवठा क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार असून, या भागीदारी अंतर्गत कंपनी फक्त भारतातील ग्राहकांनाच नाहीतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांनासुद्धा भारतीय डाक विभागामार्फत त्यांचे दर्जेदार आंबे पोहच होणार आहे. आंबा उत्पादक शेतकरी आणि पुरवठादारांनी व्यवसाय वाढीसाठी डाक विभागाच्या पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय डाक विभागाने केले आहे.

error: Content is protected !!