Hapus Mango : क्यूआर कोडने हापूसची विक्री होणार; नकली हापूस आंब्याला चाप बसणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी प्रामाणिकपणे शेतात माल पिकवतो. अगदी त्याचप्रमाणे ग्राहक देखील मालाची (Hapus Mango) प्रामाणिकपणे खरेदी करत असतो. मात्र, मध्यस्थी विक्रेते हे शेतमालासोबत छेडछाड करत असतात. किंवा ग्राहकांनाही अस्सल प्रजातीच्या शेतमालाची फारशी जाण नसते. त्यामुळे एखादा गुणवत्तापूर्ण शेतमाल खरेदी करणे ग्राहकांना जिकरीचे जाते. सध्या महाराष्ट्रातील जीआय मानांकन प्राप्त असलेल्या हापूस आंब्यासोबतही (Hapus Mango) असेच काही घडत आहे.

हापूसच्या नावाखाली खपतोय कर्नाटकी आंबा (Hapus Mango Sold By QR Code)

कर्नाटकातील अगदी हापूससोबत साधर्म्य असलेला आंबा हापूसच्या नावाखाली विक्रेत्यांकडून खपवला जात आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांसोबतच ग्राहकांनाही फायदा व्हावा. यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक शेतकरी व विक्रेते सहकारी संस्थेने क्यूआर कोड लावूनच हापूसची विक्री केली जाणार असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे आता हापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

क्यूआर कोडमुळे काय होणार?

महाराष्ट्रातील कोकणच्या हापूस आंब्याला (Hapus Mango) जीआय हे भौगोलिक मानांकन फार पूर्वीच मिळाले आहे. कोकणच्या हापूस आंब्याची एक विशिष्ट ओळख आहे. आणि तो ग्राहकांनाही विशेष भावतो. ज्यामुळे आता कोकण हापूस आंबा उत्पादक शेतकरी व विक्रेते सहकारी संस्थेकडून राज्यातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना क्यूआर कोड दिले जाणार आहे. ज्यामुळे संबंधित गुणवत्तापूर्ण अस्सल हापूस आंब्याची ग्राहकांना ओळख होण्यास मदत होणार आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून त्या आंब्याची पॅकिंग तारीख, खराब होण्याची तारीख (एक्सपायरी डेट), तसेच संबंधीचे उत्पादक शेतकऱ्याची सविस्तर माहिती मिळणार आहे. ज्यामुळे अस्सल हापूस बाजार भाव खाऊन, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकळ यांनी म्हटले आहे की, कोकणातील हापूस अर्थात अल्फांसो आंब्याला जीआय टॅग मिळालेला आहे. मात्र, आता क्यूआर कोडनेच हा हापूस आंबा विकला जाणार आहे. ज्यामुळे बाजारातील बनावट खोरीला चाप बसणार आहे. तर कोकणातील हापूस शेतकऱ्यांना देखील योग्य दर मिळण्यास याचा फायदा होणार आहे. याशिवाय ग्राहकांना देखील हापूस ओळख होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!