Harbhara Bajar Bhav : हरभरा दरात सुधारणा; वाचा… किती मिळतोय सध्या बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसात हरभरा दर (Harbhara Bajar Bhav) हमीभावापर्यंत खाली घसरले होते. मात्र, आता सध्या हरभरा दरात पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने यावर्षीच्या हंगामात हरभऱ्यासाठी 5440 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये हरभरा दर हे 6000 रुपये प्रति क्विंटलहुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात आवक घटल्याने दरात तेजी पाहायला मिळत असून, आगामी काळात हरभरा दरात (Harbhara Bajar Bhav) तेजी कायम राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

काबुली हरभऱ्याला सर्वाधिक दर (Harbhara Bajar Bhav Today 15 April 2024)

राज्यात सध्या काबुली हरभरा चांगलाच भाव (Harbhara Bajar Bhav) खात आहे. अकोला बाजार समितीत काबुली हरभऱ्याला सर्वाधिक कमाल 10570 ते किमान 8800 रुपये तर सरासरी 9750 रुपये प्रति क्विंटल, जळगाव बाजार समितीत काबुली हरभऱ्याला सर्वाधिक कमाल 8805 ते किमान 8000 रुपये तर सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल, जालना बाजार समितीत काबुली हरभऱ्याला सर्वाधिक कमाल 7199 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7199 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

आजचे राज्यातील हरभरा बाजारभाव

राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे कमाल दर (Harbhara Bajar Bhav) हे 6000 रुपये प्रति क्विंटलहुन अधिक आहे. सोलापूर बाजार समितीत कमाल 6240 ते किमान 5500 रुपये तर सरासरी 5950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. औराद शहाजानी (लातूर) बाजार समितीत कमाल 6526 ते किमान 6251 रुपये तर सरासरी 6388 रुपये प्रति क्विंटल, चाकूर (लातूर) बाजार समितीत कमाल 6152 ते किमान 5151 रुपये तर सरासरी 6063 रुपये प्रति क्विंटल, जालना बाजार समितीत कमाल 6181 ते किमान 5600 रुपये तर सरासरी 5850 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अमरावती बाजार समितीत कमाल 6382 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 6191 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत कमाल 6145 ते किमान 5400 रुपये तर सरासरी 5772 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत कमाल 6270 ते किमान 5400 रुपये तर सरासरी 6053 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत कमाल 8500 ते किमान 5800 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल, वर्धा बाजार समितीत कमाल 6095 ते किमान 5480 रुपये तर सरासरी 5800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आवक कमी, उठाव अधिक

राज्यासह देशातही बऱ्याच भागांमध्ये हरभऱ्याचे भाव मागील चार ते पाच दिवसांमध्ये वाढले आहेत. प्रामुख्याने बाजारात आवक कमी असल्याने, आणि तुलनेत उठाव अधिक असल्याने हरभरा बाजारात सुधारणा दिसून आली आहे. त्यात्याच यंदा योग्य त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने हरभरा उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली आहे. परिणामी, आगामी काळात दरात घसरण न होताच तेजी राहण्याची शक्यता अधिक असल्याची शक्यता हरभरा व्यापारातील जाणकार व्यक्त करत आहे.

error: Content is protected !!