Harbhara Bajar Bhav : हरभरा बाजारभाव दबावात; पहा ‘किती’ मिळतोय दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी घटल्याने आणि पेरणीस अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने या आठवड्यात हरभरा बाजार भावावर (Harbhara Bajar Bhav) काहीसा दबाव पाहायला मिळत आहे. या आठवड्यात देशातील प्रमुख हरभरा उत्पादक राज्यातील बाजार समित्यांमध्ये 50 ते 150 रुपये प्रति क्विंटल, तर हरभरा डाळीच्या दरातही 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे.

या आठवड्यात महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये हरभरा दरात (Harbhara Bajar Bhav) 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. सोलापूर बाजार समितीत हरभऱ्याला कमाल 6350 ते किमान 5600 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत कमाल 6175 ते किमान 6125 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत कमाल 5800 ते किमान 5700 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील उदगीर बाजार समितीत कमाल 5800 ते किमान 5700 रुपये प्रति क्विंटल, जळगाव बाजार समितीत कमाल 6600 ते किमान 6300 रुपये प्रति क्विंटल तर अहमदनगर बाजार समितीत कमाल 6500 ते किमान 6300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

प्रमुख राज्यांमधील बाजारभाव (Harbhara Bajar Bhav In India)

या आठवड्यात मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमधील हरभरा दरातही 50 ते 150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. मध्यप्रदेशातील इंदोर बाजार समितीत या आठवड्यात हरभऱ्याला कमाल 6200 ते किमान 6250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. राजस्थानच्या जोधपूर बाजार समितीत कमाल 5700 ते किमान 4800 रुपये प्रति क्विंटल, जयपूर बाजार समितीत कमाल 6375 ते किमान 6325 रुपये प्रति क्विंटल तर बिकानेर बाजार समितीत 6150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर तिकडे कर्नाटकातील गुलबर्गा बाजार समितीत हरभऱ्याला या आठवड्यात कमाल 6200 ते किमान 5800 रुपये प्रति क्विंटल तर बीदर बाजार समितीत कमाल 5760 ते किमान 5005 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

हरभरा डाळीच्या दरातही घसरण

दरम्यान, मागणी घटल्याने या आठवड्यात हरभरा डाळीच्या दरातही 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलची घसरण पाहायला मिळाली. दिल्ली येथील बाजारात हरभरा डाळीला सध्या कमाल 7450 ते किमान 7175 रुपये प्रति क्विंटल, गुलबर्गा येथील बाजारात कमाल 7400 ते किमान 7200 रुपये प्रति क्विंटल, जळगाव व इंदोर येथील बाजारात संयुक्तपणे 7300 रुपये प्रति क्विंटल तर कानपुर येथील बाजारात हरभरा डाळीला कमाल 7150 ते किमान 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

error: Content is protected !!