Harbhara Bajar Bhav : हरभरा दरात चढ कि उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या हंगामात राज्यातील बाजार समित्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नवीन हरभऱ्याची (Harbhara Bajar Bhav) आवक होण्यास सुरुवात झाली. तेव्हा हरभरा दरात काहीशी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, मागील चार ते पाच दिवसांमध्ये हरभरा दरात जवळपास सरासरी 400 रुपये प्रति क्विंटलने घसरण नोंदवली गेली आहे. प्रामुख्याने राज्यात असलेले ढगाळ हवामान आणि पावसाच्या वातावरणामुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हरभऱ्याच्या दर घसरणीमुळे (Harbhara Bajar Bhav) शेतकरी चिंतातुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वाधिक दर कुठे? (Harbhara Bajar Bhav Today In Maharashtra)

अकोला बाजार समितीत आज काबुली हरभऱ्याची (Harbhara Bajar Bhav) 39 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8300 ते किमान 7400 रुपये तर सरासरी 7850 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची 36 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6400 रुपये तर सरासरी 6950 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची 1415 क्विंटल आवक झाली असून, कमाल 8500 ते किमान 4400 रुपये तर सरासरी 7300 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची 2852 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6305 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5835 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

नागपूर बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची (Harbhara Bajar Bhav) 3782 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5750 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5564 रुपये प्रति क्विंटल, दौंड-पाटस (पुणे) बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5700 ते किमान 5700 रुपये तर सरासरी 5700 रुपये प्रति क्विंटल, राहता (अहमदनगर) बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची 12 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5541 ते किमान 5525 रुपये तर सरासरी 5533 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची 20 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4300 ते किमान 4900 रुपये तर सरासरी 5533 रुपये प्रति क्विंटल, उमरखेड (यवतमाळ) बाजार समितीत आज लाल हरभऱ्याची 570 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5500 ते किमान 5200 रुपये तर सरासरी 5300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

उत्पादक शेतकरी चिंतातुर

दरम्यान केंद्र सरकारने यावर्षीच्या रब्बी हरभऱ्यासाठी 5440 रुपये प्रति क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निर्धारित केलेली आहे. मात्र, सध्या काही बाजार समित्यांमध्ये हरभरा दर (Harbhara Bajar Bhav) हमीभावापेक्षा खाली घसरल्याने शेतकर्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सर्वच बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर सरासरी 6200 रुपयेपर्यंत वाढलेले होते. सर्व बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल 6000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळत होता मात्र, सध्या सरासरी हरभरा दर 5800 रुपयेपर्यंत खाली घसरलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे बाजार समित्यांमध्ये हरभरा विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा सूर पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!