Harbhara Kharedi : ‘या’ राज्यात 1 लाख 39 हजार टन हरभरा खरेदी होणार; केंद्र सरकारची मंजुरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (Harbhara Kharedi) केंद्र सरकारकडून कर्नाटक या राज्यातून हमीभावाने (किमान आधारभूत किंमत) यावर्षी 1 लाख 39 हजार टन हरभरा खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी अतिरिक्त 178.65 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 2023-24 या आर्थिक वर्षात शेतमाल खरेदीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकूण 761.89 कोटींचा निधीची तरतूद (Harbhara Kharedi) करण्यात आली असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

235.14 कोटींचा निधी मंजूर (Harbhara Kharedi In Karnataka)

केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी याबाबत माहिती प्रसिद्ध करताना म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून 2023-24 च्या रब्बी हंगामात कर्नाटक या राज्यातील हमीभावने हरभरा खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे यावर्षीच्या हंगामात केंद्राकडून कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून एकूण 1 लाख 39 हजार टन हरभरा खरेदी केला जाणार आहे. याशिवाय केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कर्नाटक सरकारला तिसऱ्या टप्प्यातील 235.14 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार, यावर्षीच्या रब्बी हंगामात कर्नाटकातील शेतकऱ्यांना 139,740 टन हरभरा खरेदीसाठी 5,440 रुपये इतकी किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी निश्चित करण्यात आली आहे.

खरेदी प्रक्रियेसाठी निधीची तरतूद

कर्नाटकातील हरभरा खरेदीसाठी 235.14 कोटींचा निधी मंजूर करण्याबाबत शोभा करंदलाजे यांनी म्हटले आहे की, या निधीचा उपयोग कर्नाटक सरकारला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हमीभावाने शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करता यावी. यासाठी देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने गोदामांची निर्मिती, पाणी साचू नये यासाठी उपाययोजना, हरभरा खरेदी केंद्रांची स्थापना, ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ड्रोनची खरेदी, एकात्मिक शेतीला प्रोत्साहन, मातीच्या घटकांखालील कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यावर काम करता यावे. यासाठी देण्यात आली आहे.

error: Content is protected !!