Havaman Andaj । राज्यात आज (दि. 1) कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार, तर विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वत्रच दमदार पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे.
जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता
बिपॉरजॉय या चक्रिवादळामुळे राज्यात 14 दिवस उशिरा मान्सून दाखल झाला. 25 जून नंतर मान्सून सक्रिय झाला आहे. जून महिन्यात पावसाची तूट झाली. मात्र, जुलै महिन्यात राज्यात 100 ते 106 टक्के म्हणजेच सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल. तसेच 4 जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्यामुळे मान्सून अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले आहे. (Havaman Andaj)
तुमच्या गावात कधी पाऊस होणार?
आता आपल्या गावात कधी पाऊस होणार याबाबत अचूक माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे शेतकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणाचा अचूक हवामान अंदाज देण्यात येतो. तसेच या अँपवर रोजचे बाजारभाव, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन मोजणे आदी सेवा मोफत देण्यात येतात. तुम्ही शेतकरी असाल तर हॅलो कृषी मोबाईल अँप तुमच्याकडे असायलाच हवे. आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करून अँप डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.
राज्यात खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन, मूग, मटकी, मका, कांदा, खरीप ज्वारी, कापूस, भात ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. या पिकांची पेरणी जून महिन्यातच होत असते. मात्र चांगल्या पावसाअभावी जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पेरण्या लांबल्या असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
जोरदार पावसाचा अंदाज असणारे जिल्हे (यलो अलर्ट) – पालघर, मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा
विजासह पावसाचा अंदाज असणारे जिल्हे (यलो अलर्ट) – बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ.