Havaman Andaj । राज्यासह देशभरात पावसाचे थैमान! पुढील 36 तासांत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update । महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनचं आगमन उशिरा झाले. तळ कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biperjoy) मोठा फटका राज्याला बसल्याने मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूनने राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rain) झाला आहे. पावसामुळे जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तरीही पावसाचा कहर अजून सुरूच आहे.

येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट तसेच उत्तर भारतातील राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात आज बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

बंधारे गेले पाण्याखाली

कोल्हापुर (Kolhapur) जिल्ह्यात सलग तीन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे येत आहे.

पेरण्यांना वेग

अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग देखील सुरु झाली आहे. तसेच पूर्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.

धरणाच्या पाणी पातळीत वाढ

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे गोसे धरणक्षेत्रात संततधार पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. गोसे धरणाचे 17 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 2075.92 शतांश क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीत सर्वाधिक पावसाची नोंद

गेल्या 24 तासापासून दिल्ली आणि परिसरात जोरदार ते संततधार पाऊस सुरू आहे. 1958 सालानंतर दिल्लीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा सामान्य जनजीवनावर परिणाम झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्याकडून याबाबतची माहिती घेतली आहे. त्याचबरोबर पावसाच्या पार्शवभूमीवर दिल्लीतील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.

उत्तर भारतात देखील पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे उत्तराखंडच्या नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसामुळे १३३ वाहतूक मार्ग विस्कळीत झाले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर या राज्यांना पुढील पाच दिवस रेड अलर्ट जारी केला आहे

जिल्हा – कोल्हापूर
1) कागल=2
2) गारगोटी=10
3) हातकणंगले-
4) गडहिंग्लज =
5) राधानगरी=31
6) आजरा=17
7) शिरोळ=6
8) शाहूवाडी-12
9) पन्हाळा= 10
10) गगनबावडा=59

जळगांव जिल्हा
बोदवड-5
भुसावळ-10
पाचोरा-3
जामनेर-0
चोपडा-10
चाळीसगाव-0
रावेर-4
मुक्ताईनगर-3
धरणगाव-8
यावल-52.8
एरंडोल-0

Sindhudurg District ☔10.7.2023*
Doodamarg-25
Kankavli-36
Malvan-5
Kudal-14
Sawantwadi-16
Devgad-12
Rameshwar Agri-2.8
Vaibhavwadi-40
Mulde_Agri-10.8
Vengurla-3.3

जिल्हा रत्नागिरी
खेड-8
लांजा-21
चिपळूण-5
देवरुख-13
राजापूर-20
मंडणगड-5
दापोली-6
गुहागर-10
वाकवली-4

Raigad District (Talukawise RF) dt 10.07.2023(mm)
Pen – 40
Mahsala – 19
Mangaon – 18
Uran – 30
Shrivardhan – 10
Khalapur – 8
Roha – 4
Poladpur – 6
Murud – 2
Sudhagad – 8
Tala – 8
Panvel – 9.2
Matheran – 33.8
Mahad – 12
Karjat – 10.2
Alibag- 1

Palghar District Talukawise Rainfall data dt. 10.7.2023
Talasri-35
Vikramgad-16
Jawahar-58
Wada-51
Palghar-33
Vasai-36
Mokhada-28.2

Thane District Talukawise Rainfall data dt. 10.7.2023
Ulhasnagar-125
Shahapur-41
Thane-34
Murbad-26
Bhiwandi-45
Ambernath-
Kalyan-24

Nashik District (Talukawise RF) dt 10.07.2023 ( in mm)
Pimpalgaon – 3.6
Satnabaglan – 0
Surgana.-
Yewla. – 1
Nandgao. – 0
Chandwad. – 3
Dindori. – 4
Sinnar. – 0
Kalwan – 3
Trambekshwar – 16
Niphad –
Igatpuri – 61
Deola – 2
Peth – 56

error: Content is protected !!