हवामान अंदाज : ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हवामान अंदाज : कोकणात आज (दि. ११) पावसाचा जोर कमी होणार असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उघडीप होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र विजांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अकोला जिल्ह्यात अनेक भागात पेरण्या सुरू झाल्या असून अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात सध्या पंचवीस टक्के जलसाठा शिल्लक आहे.

तुमच्या गावात कधी पाऊस होणार?

आता आपल्या गावात कधी पाऊस होणार याबाबत अचूक माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे शेतकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणाचा अचूक हवामान अंदाज देण्यात येतो. तसेच या अँपवर रोजचे बाजारभाव, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन मोजणे आदी सेवा मोफत देण्यात येतात. तुम्ही शेतकरी असाल तर हॅलो कृषी मोबाईल अँप तुमच्याकडे असायलाच हवे. आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करून अँप डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

३४ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात आत्तापर्यंत कोकण व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात वाढ

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये एकूण ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

हिमाचलमध्ये पावसाचा कहर

हिमाचल प्रदेशात निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे. हिमाचल येथील मंडी या भागामध्ये सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे. पुल वाहून गेले आहेत, अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तर अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहुन गेली आहेत. चंबा, कांगडा, कुल्लू, मनाली या भागातही जोरदार पाऊस झाला आहे. व्यास नदी दुथडी भरून वाहत आहे. उत्तर प्रदेशात पावसाने ३४ जणांचे बळी गेले आहेत.

केंद्र सरकारकडून मदतीच आश्वासन

देशाच्या काही भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. श्री. मोदी यांनी हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी पूरस्थिती संदर्भात चर्चा करून त्यांना केंद्र सरकारकडून मदतीचं आश्वासन दिले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा या राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे नुकसान झालेल्या महामार्गाची दुुरुस्ती आणि देखभाल करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

error: Content is protected !!