Havaman Andaj । मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जाणून घ्या एका क्लीकवर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पाऊस झाला असला तरी अजून काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात आज (दि. १२) विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. (Latest Weather update )

मान्सूनचा (Monsoon) ट्रफ उत्तर भारतातून महाराष्ट्रात येण्यास १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील उर्वरित भागात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे १७ ते १९ जुलैदरम्यान सर्वत्र अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. उत्तर भारतात सातत्यानं मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंजाब, हरियाणा, दिली आणि राजस्थान सह पश्चिमी हिमालय क्षेत्रात आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. (Havaman Andaj )

शेतकऱ्यांनो तुम्हाला जर अगदी शून्य मिनिटात हवामानाचा ताजा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर लगेचच Hello Krushi हे अँप गुगलवर जाऊन डाऊनलोड करा. या अँपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावात कधी पाऊस पडणार हे देखील जाणून घेऊ शकता. त्यामुळे लगेचच हे अँप डाऊनलोड करा. या अँपवर ताजा हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी, बाजारभाव, जमीन खरेदी विक्री त्याचबरोबर पशूंची खरेदी विक्री आदी सेवा मोफत दिल्या जातात. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल तर हे अँप डाउनलोड करायला विसरू नका

दिल्लीमध्ये पूरस्थिती

दिल्लीत यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे यमुना नदीवरील रेल्वे पुलावरुन होणारी रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे दिल्ली -अंबाला मार्गावरच्या २४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हरियाणामध्येही काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानमध्येही मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. मध्य प्रदेशमध्ये १८ जिल्ह्यांना येलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.

हिमाचलमध्ये जलप्रलय

हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी झाल्याने प्रलयासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कुल्लूमध्ये बियास नदीने रौद्र रुप धारण केल्याने अक्षरशः कागदी नावेप्रमाणे घरे, वाहने, जनावरे वाहून गेली आहेत. येथील किन्नौर जिल्ह्यांत तर राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळली. तर, अशीच चंदिगढ – मनाली राष्ट्रीय महामार्गावरही मोठी दरड कोसळली. दोन्ही महामार्गांवरच्या दरडी हटवण्याचं काम सध्या सुरू आहे.

हिमाचल प्रदेशमधल्या ७ जिल्ह्यांसाठी पुढच्या २४ तासासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

व्यास नदीला पूर आला असून, बाजार पेठांमध्ये पुराचं पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. चंदीगड- मनाली राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे बंद करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाने बाधित क्षेत्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने बचाव कार्य सुरू केले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह ४ राज्यात एनडीआरएफ च्या ३९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असलेले जिल्हे (यलो अलर्ट)

  • मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नाशिक.
  • मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.
  • विदर्भ: बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली.
error: Content is protected !!