Havaman Andaj : राज्यात मुसळधार पाऊस कधी पडणार? जाणून घ्या अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : जुलै महिन्याच्या शेवटी जोरदार बॅटिंग केलेला पाऊस आता ऑगस्ट महिन्यामध्ये गायब झालेला दिसतोय. राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र पावसाळा सुरू असताना जोरदार पावसाच्या सरी कधी कोसळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी हवामान खात्याने याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. (Havaman Andaj : )

मुसळधार पाऊस कधी कोसळणार?

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात देखील पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. काही भागांमध्ये तुरळक पाऊस असेल तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. मात्र जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्यांना 18 ऑगस्टपर्यंत वाट पाहायला लागू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यामध्ये 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये राज्यातील मराठवाडा तसेच विदर्भसह अन्य जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर अनेक जिल्ह्यात उघडीप दिलेला पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात करेल असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

25 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यात पुन्हा काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान 13 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये मोठा पाऊस पडणार नसून बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी बसणार आहेत.

तुमच्या गावात पाऊस कधी पडणार?

जशे तंत्रज्ञान बदलते तसे आपल्याला देखील बदलणे गरजेचे आहे. याचाच विचार करून आम्ही खास शेतकऱ्यांसाठी एक hello Krushi हे ॲप बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आणि मोफत रोजचा हवामान अंदाज चेक करू शकता. यामध्ये तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? याबाबत देखील तुम्हाला माहिती मिळेल. त्याचबरोबर तुम्ही या ॲपच्या माध्यमातून जमीन मोजणी करू शकता, सरकारी योजनांची माहिती घेऊ शकता, पशुंची खरेदी विक्री करू शकता. त्याचबरोबर शेतमालाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा.

error: Content is protected !!